ICC Cricket World Cup मध्ये शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी श्रीलंकेच्या विरोधात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दिल्लीत धावांचा पाऊस पाडला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात क्विंटन डी कॉक आणि रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन यांनी वैयक्तिक शतक झळकावताना विक्रमी भागीदारी केली. त्यानंतर एडन मार्करमने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्याने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेगवान शतक नोंदवले आणि १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एका इनिंग्जमध्ये तीन शतकं झळकली गेली आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय श्रीलंकेचा चांगलाच महागात पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा १०२ धावांनी पराभव केला.
असे झाले रेकॉर्ड
- दक्षिण आफ्रिकेने विश्व कप स्पर्धेतील सर्वात जास्त धावा – ४२८
- विश्व चषकात प्रथमच एका सामन्यात तीन शतके झाली
- एडन मारक्रमने सर्वात जलद शतक झळकावले (४९ चेंडूत १०० धावा)
- कुशल मेंडिसने कमी चेंडूत ५० धावा केल्या (२५ चेंडूत ५० धावा)
- विश्व चषकमध्ये सर्वात अधिक धावा ७५४ केल्या
(हेही वाचा Israeli-Palestinian conflict : गाझापट्टीत १९८ जणांचा मृत्यू; आता इस्त्रायलच्या हल्ल्याने पॅलेस्टिन हादरले)
Join Our WhatsApp Community