- ऋजुता लुकतुके
आयसीसीने गुरुवारी संध्याकाळी वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंसाठीच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. आणि त्यानुसार सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार पटकावणारे वर्षातील सर्वोत्तम खेळाडू ठरले आहेत – ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि इंग्लंडची तडाखेबाज फलंदाज नॅट स्किव्हर-ब्रंट. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार झाल्यापासून पॅट कमिन्सने संघाला आयसीसी कसोटी अजिंक्यपद आणि एकदिवसीय विश्वचषक अशा दोन महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धा जिंकून दिल्या आहेत. त्यासाठीच त्याला हा पुस्कार मिळाला आहे. तर नॅट स्किव्हर आतापर्यंतची सगळ्या यशस्वी महिला अष्टपैलू खेळाडू मानली जाते. (ICC Cricketer of the Year 2023)
A terrific year that ended with winning the ICC Men’s @cricketworldcup 2023 🏆
The Australia bowler and captain has claimed the Sir Garfield Sobers Trophy for ICC Men’s Cricketer of the Year 🙌https://t.co/cv5T71ji25
— ICC (@ICC) January 25, 2024
पॅट कमिन्सने या पुरस्काराबद्दल आयसीसीचे आभार मानले आहेत. ‘संघाला विजय मिळवून देण्यात बॅट आणि चेंडूने मोलाची भूमिका बजावू शकलो याचं समाधान आहे,’ अशी प्रतिक्रिया कमिन्सने दिली आहे. (ICC Cricketer of the Year 2023)
(हेही वाचा – Republic Day : भगूर येथील सावरकर स्मारकात प्रजासत्ताक दिन साजरा)
तर इंग्लिश अष्टपैलू खेळाडू नॅट स्किव्हर-ब्रंटने यंदा तीनही प्रकारात चांगली कामगिरी केली आहे. २ कसोटी सामन्यांत तिने १३७ धावा केल्या आहेत. ६ एकदिवसीय सामन्यात ३९३ आणि १० टी-२० सामन्यांमध्ये ३९४ धावा केल्या आहेत. (ICC Cricketer of the Year 2023)
Two years in a row 👏
England’s superstar all-rounder takes home the Rachael Heyhoe Flint Award for ICC Women’s Cricketer of the Year 2023 🏅https://t.co/Vjbd2qELP2
— ICC (@ICC) January 25, 2024
आयसीसीचा हा मानाचा पुरस्कार पहिल्यांदाच पटकावलेली नॅट त्यामुळे खुश आहे. यंदाच्या हंगामात महिला क्रिकेटमध्ये चांगली स्पर्धा असताना आपल्याला हा पुरस्कार मिळाला, याबद्दल तिने समाधान व्यक्त केलं आहे. ‘हा खूप मोठा बहुमान आहे. खरंतर यंदा या पुरस्काराची मी अपेक्षाच केली नव्हती. पण, आता पुरस्कार मिळाल्यावर खूप आनंद वाटतोय,’ असं स्किव्हर-ब्रंटने बोलून दाखवलं. महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार श्रीलंकेच्या चामरी अथपथ्थूने पटकावला. (ICC Cricketer of the Year 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community