टी-20 विश्वचषक 2022 मध्ये इंग्लंडने बाजी मारल्यानंतर आता 2024 च्या वर्ल्ड कपसाठी ICC ने तयारी सुरू केली आहे. पहिल्यांदाच अमेरिकेत विश्वचषक होणार असून या विश्वचषकासाठी एक नवा फॉरमॅट देखील पहायला मिळणार आहे. यामध्ये सुपर 12 फॉरमॅट बाद होऊन एक नवा फॉरमॅट बनवण्यात येणार आहे.
2024 चा विश्वचषक हा एकूण 20 संघांमध्ये खेळवण्यात येणार असून, त्यापैकी 12 संघांची थेट निवड झाली आहे. तर उर्वरित 8 संघांसाठी पात्रता फेरी पार पडणार आहे. त्यामुळे आता सुपर 12 च्या फॉरमॅटमध्ये बदल करण्यात येणार आहे.
(हेही वाचाः Google Pay,Phone Pe व्यवहारांवर नियंत्रण येण्याची शक्यता, किती रुपयांपर्यंत करता येणार Transaction?)
असा असेल फॉरमॅट
- 20 संघांचा सहभाग असलेला विश्वचषक 2024 हा बाद फेरीपूर्वी दोन टप्प्यांमध्ये खेळवण्यात येणार आहे
- या 20 संघांची 4 वेगवेगळ्या गटांत विभागणी केली होती
- त्यानंतर या प्रत्येक गटातील अव्वल दोन संघांमध्ये Super 8 ची लढत होणार आहे
- Super 8 मध्येही संघांची दोन गटांत विभागणी करण्यात येणार असून या दोन्ही गटांतील अव्वल दोन संघांमध्ये उपांत्य फेरीची चुरस रंगणार आहे
या संघांची थेट निवड
2024 चा टी-20 विश्वचषकचे यजमानपद वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांना मिळाले आहे. त्यामुळे या विश्वचषकासाठी अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ आधीच पात्र ठरले असून, 2022 च्या विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया,इंग्लंड,भारत,न्यूझीलंड,श्रीलंका,पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स हे अव्वल 8 संघ 2024 च्या विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. तसेच ICC रँकिंगनुसार, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश या देशांनी देखील 2024 च्या विश्वचषकासाठी प्रवेश पक्का केला आहे.
(हेही वाचाः 21 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवरील ‘या’ लोकल होणार 15 डब्यांच्या, बघा संपूर्ण यादी)
Join Our WhatsApp Community