आयसीसी टी-२० विश्वचषकाचा मुहूर्त अखेर ठरला!

17 ऑक्टोबर, 2021 रोजी स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार असल्याचेही आयसीसीने स्पष्ट केले.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे क्रिकेट विश्वासाला जोरदार धक्का बसला आहे. क्रिकेटचे सामने होतील का, अशी अनिश्चितता निर्माण झाली असताना आयसीसीसी टी-२० विश्वचषकाचा मुहूर्त ठरला आहे. यंदाच्या वर्षीही हे सामने भारताऐवजी दुबईत खेळवले जाणार आहेत.

‘या’ चार मैदानानांवर होणार सामने!

या स्पर्धेचे सर्व अधिकार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे राहणार आहेत. 17 ऑक्टोबर, 2021 रोजी स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार असल्याचेही आयसीसीने स्पष्ट केले. संपूर्ण सामने केवळ चार मैदानात खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये दुबई इंटरनेशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबूधाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी ग्राउंड या मैदानांचा समावेश आहे.

(हेही वाचा : मराठमोळ्या राहीने साधला अचूक ‘निशाणा’! शूटिंगमध्ये पटकावले सुवर्ण पदक!)

असे खेळवले जाणार सामने! 

पहिल्या राऊंडमध्ये 8 संघांदरम्यान 12 सामने खेळविले जातील. यामधून चार संघ सुपर 12 साठी क्वालिफाय करतील. आठमधल्या चार टीम अव्वल 8 रँकिंगमध्ये सामिल होऊन सुपर 12 मध्ये पोहोचतील. यानंतर 12 संघात एकूण 30 सामने खेळले जातील. जे सामने 24 ऑक्टोबरपासून सुरु होतील. सुपर 12 दोन विभागांमध्ये (सहा-सहा) विभाजित केल्या जातील. या मॅचेस तीन ठिकाणी होतील. दुबई अबूधाबी आणि शारजाहला मॅचेस खेळविण्याचा नियोजन होतील. यानंतर तीन नॉक आऊट सामने होतील. दोन सेमी फायनल आणि एक फायनल…!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here