पाकिस्तानचा क्रिकेट संघ एकदिवसीय विश्वचषकासाठी ICC ODI Cricket World Cup हैद्राबादमध्ये आला तेव्हा भारतीय चाहत्यांनी त्यांचं चांगलंच स्वागत केलं. विमानतळावर भारतीय चाहते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पाक खेळाडूंनीही सोशल मीडियावर त्याचे फोटो टाकून भारतीय आदरातिथ्यांचं कौतुक केलं. आता मेहमाननवाजीचा पुढचा टप्पा म्हणजे भारतीय जेवण. पाकिस्तानी खेळाडूंची गरज लक्षात घेऊन त्यांना हैद्राबादी आणि प्रथिनयुक्त जेवण दिलं जात आहे.
खेळाडूंच्या रोजच्या मेन्यूमध्ये आहे हैद्राबादी बिर्याणी, लँब चॉप्स, मासे आणि मटन. पीटीआय वृत्तसंस्थेनं पाक खेळाडूंसाठी बनवण्यात आलेला मेन्यूच प्रसिद्ध केला आहे. आणि त्यात ग्रिल्ड लँब चॉप्स, मटन करी, बटर चिकन आणि ग्रिल्ड चिकन यांचा समावेश आहे. शिवाय हैद्राबादी बिर्याणी तर आहेच. बटर चिकन ही पाक खेळाडूंची खास फर्माईश आहे. भारतात बिफ म्हणजेच गाई-म्हशीच्या मांसावर बंदी आहे. त्यामुळे पाकिस्तान किंवा इतर देशातील खेळाडूंनाही बिफ दिलं जाणार नाही.
(हेही वाचा Ganesh Visarjan 2023 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…विसर्जनाचे सचित्र क्षण पहा)
पण, पाकिस्तान प्रशासनाने कार्बोदकांचा स्त्रोत म्हणून वाफावलेला बासमती भात, स्पाघेती तसंच शाकाहारी पुलावाची मागणी केली आहे. खेळाडू जेव्हा डाएटवर नसतील, तेव्हा त्यांना बिर्याणी दिली जाईल.
Pakistan Cricket Team have safely reached the team hotel in Hyderabad and straightaway had the famous Hyderabadi Biryani in India. #worldcup2023 #BabarAzam𓃵 #pakistancricket pic.twitter.com/fZAU5uSB06
— King👑 Babar Azam Fans club (@BasitBasit24360) September 27, 2023
भारतात आल्यानंतर पाक खेळाडूंनी गुरुवारी पहिल्यांदा इथं सराव केला. त्यानंतर बाबर आझमची एक पत्रकार परिषदही झाली. आणि यात सरावाच्या सुविधा तसंच जेवण याविषयी बाबर आझमने समाधान व्यक्त केलं आहे.
आता पाक संघ विश्वचषकाच्या ICC ODI Cricket World Cup पहिल्या सामन्यापूर्वी दोन सराव सामने खेळणार आहे. पहिला सामना शुक्रवारी न्यूझीलंड विरुद्ध तर दुसरा सराव सामना पुढच्या मंगळवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. आणि त्यानंतर विश्वचषकाचा पहिला सामना पाकिस्तानचा संघ खेळेल तो ६ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध. विश्वचषकाच्या निमित्ताने पाक संघ किमान दोन आठवडे भारतात असेल.
Join Our WhatsApp Community