ICC ODI Ranking : मोहम्मद सिराजला क्रमवारीतील अव्वल स्थान नाही तर ‘ही’ गोष्ट हवीय

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज हे अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीत अव्वल ठरले आहेत. पण, मोहम्मद सिराजला सध्या अव्वल स्थान नाही तर दुसरीच एक गोष्ट हवी आहे.

110
ICC ODI Ranking : मोहम्मद सिराजला क्रमवारीतील अव्वल स्थान नाही तर ‘ही’ गोष्ट हवीय
ICC ODI Ranking : मोहम्मद सिराजला क्रमवारीतील अव्वल स्थान नाही तर ‘ही’ गोष्ट हवीय
  • ऋजुता लुकतुके

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज हे अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीत अव्वल ठरले आहेत. पण, मोहम्मद सिराजला सध्या अव्वल स्थान नाही तर दुसरीच एक गोष्ट हवी आहे. (ICC ODI Ranking)

जेमतेम २०१७ मध्ये भारतीय संघात आलेला मोहम्मद सिराज अल्पावधीतच भारतीय भात्यातील प्रमुख अस्त्र बनला आहे. वेगवान गोलंदाजी आणि सुरुवातीच्या षटकांमध्ये बळी टिपण्याची हातोटी याच्या जोरावर भारतीय संघात त्याने स्थान बळकट केलं आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो जास्त यशस्वी ठरला आणि म्हणता म्हणता आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीतही त्याने अलीकडेच अव्वल स्थान पटकावलं आहे. (ICC ODI Ranking)

पण, सिराज इतक्यावर समाधानी नाही. क्रमवारीतल्या अव्वल स्थानापेक्षा भारताने विश्वचषक जिंकावा हीच इच्छा असल्याचं त्याने बोलून दाखवलंय. (ICC ODI Ranking)

‘खरं सांगू. या घडीला क्रमवारीतील अव्वल स्थान माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. मला भारताने विश्वचषक जिंकलेला पाहायचाय. ते माझ्या संघाचं आणि म्हणून माझंही लक्ष्य आहे,’ असं सिराज एका व्हीडिओत म्हणाला आहे. पुढे तो असंही म्हणतो की, ‘संघासाठी माझी कामगिरी नेहमी चांगली होवो, इतकीच माझी इच्छा आहे.’ (ICC ODI Ranking)

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

(हेही वाचा – Ind vs NZ Semi Final : ‘भारताबरोबर उपान्त्य फेरी खेळणं सोपं नसेल’)

‘या संघाचा मी एक भाग आहे याचा मला अभिमान आहे. विश्वचषकात आम्ही चांगली कामगिरी करतोय. मी या संघाबरोबर आहे यातच माझा आनंद आहे. इथून पुढे प्रत्येक सामन्यात संघाने चांगली कामगिरी करावी, एवढीच माझी इच्छा आहे,’ असं सिराज म्हणाला. (ICC ODI Ranking)

स्वत: सिराजने या विश्वचषकात आतापर्यंत ८ सामन्यांमध्ये १० बळी घेतले आहेत. पण, एकूण वर्षभरात त्याने ३१ बळी मिळवले आहेत. आतापर्यंतच्या फॉर्मचं बक्षीस म्हणून अव्वल स्थानावर त्याने झेप घेतली आहे. फक्त सिराजच नाही तर त्याच्याबरोबर जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शामी हे भारतीय तेज त्रिकुट सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे आणि आयसीसी क्रमवारीतही बुमरा तीन स्थानं वर चढत चौथ्या स्थानावर पोहोचलाय. तर मोहम्मद शामीही दहाव्या स्थानावर आहे. कुलदीप यादव हा आणखी एक भारतीय गोलंदाज सातव्या स्थानावर आहे. (ICC ODI Ranking)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.