ICC ODI Ranking: विराट दुस-या स्थानी कायम, तर रोहित आणि बुमरा कितव्या स्थानी? वाचा…

74

आयसीसीकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंची क्रमवारी जारी करण्यात आली आहे. या क्रमवारीनुसार भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपले दुस-या क्रमांकाचे स्थान कायम राखले आहे. या क्रमवारीत पहिल्या स्थानी पाकिस्तानचा बाबर आजम आहे. तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये रविंद्र जडेजा या आयसीसी क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे.  रोहित शर्मा आणि बुमराह कितव्या स्थानी आहेत ते जाणून घेऊया.

भारतातील फक्त चार खेळाडू

दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौ-याला मुकलेला रोहित या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह सातव्या क्रमांकावर आहे. गोलंदाज, फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारतीय संघातील फक्त चार खेळाडूंना आपलं स्थान पटकावता आले आहे.

( हेही वाचा :मालाड क्रीडा संकुलाला टिपू सुलतानच्या नावास विरोध; भाजप आणि बजरंग दल आक्रमक )

भारताच्या फलंदाजांकडून निराशा

दक्षिण आफ्रिकेचा नुकताच झालेला विजय दक्षिण आफ्रिका खेळाडूंसाठी मोठा फायद्याचा ठरला आहे. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने पहिल्या पाच फलंदाजांमध्ये स्थान पटकावले आहे तर रूसी व्हॅन डर डुसेन याने अव्वल दहामध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच भारतावर क्लिन स्वीप विजय मिळवला आहे. या मालिकेत भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांकडून निराशा पदरी पडल्याने, भारताला या मालिकेला मुकावे लागले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.