ICC ODI Ranking : आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या पाच जणांमध्ये तीन भारतीय

ICC ODI Ranking : एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत रोहितने विराटला मागे टाकून तिसरा क्रमांक पटकावला आहे.

50
ICC ODI Ranking : आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या पाच जणांमध्ये तीन भारतीय
  • ऋजुता लुकतुके

चॅम्पियन्स करंडकात अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध ७६ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून देणारा कर्णधार रोहीत शर्मा या कामगिरीनंतर आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतही वर चढला आहे. विराट कोहलीला मागे टाकून आता रोहित तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर शुभमन गिल आपला अव्वल क्रमांक राखून आहे. विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे पहिल्या पाच जणांमध्ये तीन भारतीय फलंदाज विराजमान आहेत. विराट कोहलीने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत ५ सामन्यांमध्ये ५७ च्या सरासरीने २१८ धावा केल्या होत्या. (ICC ODI Ranking)

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सर्वाधिक २४६ धावा करत न्यूझीलंडचा रचिल रवींद्र स्पर्धेत सर्वोत्तम ठरला होता. त्यानंतर आयसीसी क्रमवारीत तेरा स्थान वर चढून तो सोळाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर आणखी एक किवी फलंदाज डेरिल मिचेल सहाव्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू ग्लेन फिलीप पहिल्यांदाच पहिल्या २५ खेळाडूंमध्ये पोहोचला आहे. चॅम्पियन्स करंडकात न्यूझीलंड संघाचं नेतृत्व करणारा मिचेल सँटनर गोलंदाजांच्या क्रमवारीत थेट सहा जागांची उसळी घेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सँटनरने स्पर्धेत नऊ गडी बाद करताना अंतिम सामन्यातही दोन मोलाचे बळी घेतले होते. (ICC ODI Ranking)

(हेही वाचा – Holi Festival 2025 : सण शिमग्याचो इलो रे…)

गोलंदाजांच्या क्रमवारीत श्रीलंकेचा महिष थिक्षणा अजूनही अव्वल क्रमांक राखून आहे. मायकेल ब्रेसवेलही आता अठराव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनीही गोलंदाजांच्या क्रमवारीत आगेकूच केली आहे. कुलदीपने चॅम्पियन्स करंडकात सात बळी मिळवले आणि तो आता सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर रवींद्र जडेजा दहाव्या क्रमांकवर आहे. (ICC ODI Ranking)

एकदिवसीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अफगाणिस्तानचा ओमारझाई पहिल्या क्रमांकावर आहे. पण, चॅम्पियन्स करंडकातील कामगिरीनंतर मिचेल सँटनर चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर ब्रेसवेल सातव्या आणि रवींद्र जाडेजा आठव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. (ICC ODI Ranking)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.