- ऋजुता लुकतुके
आयसीसीच्या २०२४ त्या सर्वोत्तम एकदिवसीय संघात भारताच्या एकाही खेळाडूचा समावेश नाही. तर या संघात श्रीलंकेचे ४, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी तीन आणि विंडिजच्या एका खेळाडूचा समावेश आहे. भारतीय संघ या हंगामात फक्त ३ एकदिवसीय सामने खेळला आणि श्रीलंकेविरुद्धचे दोन भारताने गमावले. एक सामना अनिर्णित राहिला. (ICC ODI Team of the Year)
याउलट श्रीलंकन संघाची कामगिरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये लक्षवेधी ठरली आहे. चरिथ असालंकाला त्याच्या फॉर्ममुळे कप्तानीचा मानही मिळाला आहे. असालंकाने या वर्षांत १३ सामन्यांमध्ये ५० च्या सरासरीने ६०५ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. लंकन संघही या हंगामात एकूण १८ सामने खेळला आणि यातील १२ त्यांनी जिंकले. २ अनिर्णित राहिले. (ICC ODI Team of the Year)
(हेही वाचा – Jammu and Kashmir: लष्करी छावणीवर दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार)
Presenting the ICC Men’s ODI Team of the Year 2024 featuring the finest players from around the world 👏 pic.twitter.com/ic4BSXlXCc
— ICC (@ICC) January 24, 2025
अफगाणिस्तानच्या संघानेही त्यांनी खेळलेल्या १४ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने ९ पैकी ७ सामने जिंकले आहेत. त्यामुळे सर्वोत्तम खेळाडूंच्या संघात या तीन संघातील खेळाडूंचा भरणा आहे. विंडिज फलंदाज शरफेन रुदरफोर्डने या हंगामात १०६ धावांच्या सरासरीने ४२९ धावा जमवल्या आहेत. त्यामुळे त्याचाही या संघात समावेश आहे. रुदरफोर्डने २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे आणि त्यानंतर लगेचच आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळेच एरवी सर्वच्या सर्व आशियाई खेळाडू असलेल्या संघात रुदरफोर्ड हा एकटा अमेरिकन खंडातील खेळाडू ठरला आहे. (ICC ODI Team of the Year)
आयसीसी २०२४ सर्वोत्तम एकदिवसीय संघ – चरिथ असालंका (कर्णधार-श्रीलंका), साईम अयूब (पाकिस्तान), रहमतुल्ला गुरबाझ (अफगाणिस्तान), पथुम निसांका (श्रीलंका), कुशल मेंडिस (यष्टीरक्षक, श्रीलंका), शरफेन रुदरफोर्ड (वेस्ट इंडिज), अझमतुल्ला ओमारझाई (अफगाणिस्तान), वानिंदू हसरंगा (श्रीलंका), शाहीन शाह आफ्रिदी (पाकिस्तान), हारिस रौफ (पाकिस्तान) व आम गझनफर (अफगाणिस्तान) (ICC ODI Team of the Year)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community