- ऋजुता लुकतुके
गेल्यावर्षी पार पडलेली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारतीय संघाने गाजवली. आणि त्याच्या जोरावर आयसीसीच्या (ICC) वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय संघात भारताच्या तब्बल पाच जणांनी स्थान मिळवलं आहे. संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्मा आहे. तर त्याच्या खेरिज विराट कोहली, शुभमन गिल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शामी आणि कुलदीप यादव हे खेळाडूही संघात आहेत. (ICC ODI Team)
‘विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलियन संघ आणि उपविजेता ठरलेला भारतीय संघ (Indian team) यांचंच वर्चस्व यंदाच्या आयसीसी एकदिवसीय संघावर आहे,’ असं आयसीसीने (ICC) वर्षातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा संघ जाहीर करताना म्हटलं आहे. (ICC ODI Team)
2023 was an excellent year for ODI cricket 🔥
What do you make of this ICC Men’s ODI Team of the Year?
More ➡️ https://t.co/UK0dSXIPyW pic.twitter.com/AEWXvE751C
— ICC (@ICC) January 23, 2024
शुभमन गिलच्या सर्वाधिक १,५७७ धावा
२०२३ वर्षात रोहित शर्माने १,२५५ एकदिवसीय धावा ठोकल्या त्या ५२ च्या सरासरीने. एकदिवसीय विश्वचषकातही सलामीला येऊन भारताला चांगली पायाभरणी करून देण्याची भूमिका त्याने वेळोवेळी निभावली. तर रोहितचा आयसीसी (ICC) संघातील सलामीचा साथीदार आहे भारताचाच युवा सलामीवीर शुभमन गिल. शुभमन गिलने २०२३ मध्ये भारतातर्फे सर्वाधिक १,५७७ धावा केल्या आहेत. (ICC ODI Team)
विश्वचषकाच्या अंतिम फेरीत शतक ठोकणारा ट्रेव्हिस हेड तिसऱ्या क्रमांकासाठी आयसीसीचा पहिला पर्याय असेल. तर चौथ्या क्रमांकावर आहे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली. विश्वचषक स्पर्धा कोहलीसाठी मोठं यश देऊन गेली. ७६५ धावा करताना त्याने १०१ धावांची तगडी सरासरी राखली. आणि महत्त्वाचं म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५१ आंतरराष्ट्रीय शतकं ठोकण्याचा विक्रमही याच दरम्यान त्याने केला. (ICC ODI Team)
(हेही वाचा – BCCI Annual Awards : रवी शास्त्री, फारुख इंजिनिअर यांना जीवनगौरव पुरस्कार )
न्यूझीलंडचा डेरिल मिचेल यालाही मधल्या फळीत स्थान देण्यात आलं आहे. आणि यष्टीरक्षणाची जबाबदारी आफ्रिकन क्लासेनवर सोपवण्यात आली आहे. मार्को जानसेन हा आणखी एक आफ्रिकन खेळाडू संघात आहे. आणि त्यानंतरचे चारही गोलंदाज भारतीय आहेत. तेज गोलंदाजीसाठी आयसीसीने मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शामी यांच्यावर विश्वास दाखवलाय. तर कुलदीप यादव आणि ऑस्ट्रेलियाचा ॲडम झम्पा संघाचे फिरकी गोलंदाज असतील. (ICC ODI Team)
आयसीसीचा २०२३ साठीचा एकदिवसीय संघ असा असेल,
आयसीसी २०२३ एकदिवसीय संघ – रोहित शर्मा (भारत, कर्णधार), शुभमन गिल (भारत), ट्रेव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), विराट कोहली (भारत), डेरिल मिचेल (न्यूझीलंड), हेनरिक क्लासेन (द आफ्रिका), मार्को जानसेन (द आफ्रिका), ॲडम झंपा (ऑस्ट्रेलिया), मोहम्मद शामी (भारत), मोहम्मद सिराज (भारत) व कुलदीप यादव (भारत) (ICC ODI Team)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community