ICC ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकातून भारताला मिळाले तब्बल १.३९ अब्ज अमेरिकन डॉलर

भारतात झालेल्या या विश्वचषकात १२.५ लाख लोकांनी सामना प्रच्यक्ष पाहिला.

121
ICC ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकातून भारताला मिळाले तब्बल १.३९ अब्ज अमेरिकन डॉलर
ICC ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकातून भारताला मिळाले तब्बल १.३९ अब्ज अमेरिकन डॉलर
  • ऋजुता लुकतुके

गेल्यावर्षी भारतात पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. पण, या स्पर्धेच्या आयोजनामुळे भारताच्या तिजोरीत तब्बल १.३९ अब्ज अमेरिकन डॉलरची भर पडली आहे. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान भारतातील दहा मैदानांवर ही स्पर्धा झाली. त्यामुळे अहमदाबाद, बंगळुरू, दिल्ली, लखनौ, चेन्नई, धरमशाला, हैद्राबाद, मुंबई, पुणे आणि कोलकाता इथं हे सामने पार पडले. त्यामुळे या शहरातील पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाला स्पर्धेचा चांगलाच फायदा झाल्याचं दिसतंय. (ICC ODI World Cup 2023)

एकट्या पर्यटन उद्योगालाच या स्पर्धेतून ८६१.४ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा उद्योग मिळाला आहे. यात आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी भारतात २८१.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर खर्च केले. इतकंच नाही तर ६८ टक्के परदेशी पर्यटकांनी भारताला पर्यटनाचं केंद्र म्हणून संमती दिली आहे. (ICC ODI World Cup 2023)

(हेही वाचा – Virat Kohli : सचिनचा ‘हा’ विक्रम मोडण्यासाठी विराटला हव्या आणखी ५८ धावा)

आयसीसीने स्पर्धेविषयीचा एक अधिकृत अहवाल तयार केला आहे. त्यात या नोंदी आहेत. भारतातील क्रिकेटच्या लोकप्रियतेवर या स्पर्धेनं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे. स्पर्धेच्या काळात एकूण १२.५ लाख लोकांनी सामना प्रत्यक्ष मैदानात जाऊन पाहिला. यातील ७५ टक्के लोक हे पहिल्यांदा आयसीसीची एकदिवसीय विश्वचषकाची (ICC ODI World Cup 2023) स्पर्धा पाहत होते. या स्पर्धेमुळे काही प्रमाणात रोजगार निर्मितीही झाली. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात ४८,००० नोकऱ्यांची निर्मिती झाली. आणि भारतीय अर्थव्यवस्थेला त्यातून १८० लाख अमेरिकन डॉलरचा महसूल मिळाला.

‘२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाने क्रिकेटची आर्थिक ताकद जगाला दाखवून दिली. कारण, भारताच्या तिजोरीत या स्पर्धेमुळे १.३९ अब्ज अमेरिकन डॉलरची भर पडली. शिवाय रोजगार निर्मिती झाली. स्पर्धेला नवीन प्रेक्षक मिळाले. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली, असंच म्हणावं लागेल,’ असं आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ ॲलरडाईस आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. (ICC ODI World Cup 2023)

भारतीय अर्थव्यवस्थेवर या स्पर्धेचा दूरगामी सकारात्मक परिणाम होणार आहे. कारण, परदेशातून आलेल्या पर्यटकांपैकी ५९ टक्के लोकांनी भारताला पुन्हा एकदा भेट देण्याचा मानस बोलून दाखवला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.