क्रिकेटप्रेमींसाठी आयसीसीने केली महत्त्वाची घोषणा

216
क्रिकेटप्रेमींसाठी आयसीसीने केली महत्त्वाची घोषणा
क्रिकेटप्रेमींसाठी आयसीसीने केली महत्त्वाची घोषणा

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा यंदा भारताच्या यजमानपदी खेळवला जाणार आहे. त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. पण यादरम्यान, आयसीसीने क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी घोषणा केली आहे. भारतात होणारी ही जागतिक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवली जाणार आहे.

सध्या विश्वचषकाच्या मुख्य फेरीतील प्रवेशासाठी विश्वचषक-२०२३ क्वालिफायर सामने खेळवले जात असून हे सामने १८ जून ते ९ जुलै दरम्यान झिम्बाब्बेमध्ये आयोजित केले आहेत. क्वालिफायरचा पहिला सामना नेपाळ आणि झिम्बाब्वे यांच्यात होत आहे. तसेच क्वालिफायरमध्ये एकूण १० संघ सहभागी होतील, ज्यातून दोघ संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचतील. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळला जाण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Asian Games : खेळाडूंच्या भविष्याशी ‘खेळ’; मान्यता नसलेल्या संस्थेकडून’एशियन गेम्स’साठी निवड चाचणी

आयसीसी विश्वचषकाच्या ट्वीटरपेजवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, लवकरच स्पर्धेचे पूर्ण वेळापत्रक जाहीर होणार आहे. तसेच क्रिडा नियतकालिकाने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या आठवड्यातच विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते.

दरम्यान १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यावर नाराज आहे, त्यामुळे अंतिम वेळापत्रक जाहीर होण्यास उशीर होत असल्याचे म्हटले जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.