ICC ODI World Cup 2023 : विश्वचषकाचे उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्याची तिकीट विक्री ‘या’ तारखेपासून सुरू

विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आणि १५ तारखेपासून बाद फेरीला सुरुवात होईल. जाणून घेऊया दोन उपांत्य लढती आणि अंतिम फेरीची तिकिटं कुठे आणि कधीपासून मिळणार. 

150
ICC ODI World Cup 2023 : विश्वचषकाचे उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्याची तिकीट विक्री ‘या’ तारखेपासून सुरू
ICC ODI World Cup 2023 : विश्वचषकाचे उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्याची तिकीट विक्री ‘या’ तारखेपासून सुरू
  • ऋजुता लुकतुके

विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आणि १५ तारखेपासून बाद फेरीला सुरुवात होईल. जाणून घेऊया दोन उपांत्य लढती आणि अंतिम फेरीची तिकिटं कुठे आणि कधीपासून मिळणार. (ICC ODI World Cup 2023)

या विश्वचषक स्पर्धेत संघ आता आपले शेवटचे साखळी सामने खेळत आहेत. तीन संघांनी उपांत्य फेरीतील प्रवेश नक्की केला आहे. पण, चौथ्या स्थानासाठी अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये चुरस आहे. १५ तारखेला पहिला उपान्त्य सामना गुणतालिकेतील पहिला संघ आणि चौथा संघ यांच्या दरम्यान मुंबईत होणार आहे. दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेबरला कोलकात्यात तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये रंगणार आहे. (ICC ODI World Cup 2023)

या तीनही बाद फेरीतील सामन्यांची तिकीट विक्री ९ नोव्हेंबरला रात्री सुरू होणार आहे. ‘विश्वचषक स्पर्धेचे तीन मार्की सामने १५ नोव्हेंबर (उपांत्य सामना-मुंबई) १६ नोव्हेंबर (दुसरा उपांत्य सामना-कोलकाता) आणि १९ नोव्हेंबर (अंतिम सामना-अहमदाबाद) असे होणार आहेत आणि त्यासाठीची तिकिटं ९ नोव्हेंबरला रात्री ८ वाजल्यापासून उपलब्ध होतील,’ असं बीसीसीआयने कळवलं आहे. (ICC ODI World Cup 2023)

(हेही वाचा – MHADA : म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ : दिवाळीपूर्वी १५० यशस्वी पात्र अर्जदारांना ऑनलाइन ताबा पत्र)

Tickets.cricketworldcup.com या वेबसाईटवर तुम्हाला तिकिटांसाठी नोंदणी करता येईल. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तसंच युपीआय आणि ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही तिकिटं खरेदी करू शकता. (ICC ODI World Cup 2023)

गुणतालिकेत सध्या भारतीय संघ ८ सामन्यांतून १६ गुण मिळवून पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेपेक्षा ते चार गुणांनी पुढे असल्यामुळे अव्वल स्थान गमावण्याची शक्यता नाही. म्हणजेच भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील सामना मुंबईत आणि १५ नोव्हेंबरला होणार हे नक्की आहे. (ICC ODI World Cup 2023)

दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ असतील अशीच शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया आपला ९वा साखळी सामना हरले तरंच त्यांचं गुणतालिकेतील स्थान आणखी खाली जाऊ शकतं. पण, रनरेटच्या निकषावरही ती शक्यता कमीच आहे. त्यामुळे दुसरा उपांत्य सामना कोलकात्यात या दोन संघांदरम्यानच होईल अशी शक्यता आहे. गुणतालिकेतील तिसरा संघ मात्र ठरायचा आहे आणि पाकिस्तान वि इंग्लंड हा शेवटचा साखळी सामना होईल, तेव्हाच तो ठरेल. (ICC ODI World Cup 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.