- ऋजुता लुकतुके
भारतातील एकदिवसीय विश्वचषकासाठी तयार केलेल्या खेळपट्टीवरून आधीच वाद झाला आहे. आता आयसीसीने अंतिम फेरीच्या खेळपट्टीला साधारण असा शेरा दिला आहे. (ICC ODI World Cup)
भारतातील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतातील खेळपट्ट्या सतत चर्चेत राहिल्या. अनेकदा त्या फिरकीला किंवा एकाच प्रकारच्या गोलंदाजीला अवास्तव मदत करणाऱ्या होत्या आणि पुरेशा खेळकर नव्हत्या, अशी टीका कर्णधारांनीही केली आहे. अंतिम सामन्यासाठी गुजरातच्या अहमदाबादमध्ये तयार केलेली खेळपट्टी तर यजमानांच्याच जीवावर उठणारी ठरली होती. भारताचा ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून पराभव केला. (ICC ODI World Cup)
(हेही वाचा – Railway : लांब पल्ल्याच्या गाड्या का धावतायेत उशिराने, काय आहे नेमके कारण)
अंतिम फेरीतील खेळपट्टी आणि कोलकात्याला झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्यासाठी वापरलेली खेळपट्टी या साधारण दर्जाच्या असल्याचा शेरा आता आयसीसीने अधिकृतपणे मारला आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या २१२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे ८ गडी बाद झाले आणि ४८ व्या षटकापर्यंत त्यांची दमछाक झाली. (ICC ODI World Cup)
तर अंतिम सामन्याची खेळपट्टी पहिल्या डावातच संथ होती आणि चेंडू बॅटवर थांबून येत होता. संध्याकाळी मात्र हवा थोडी गार झाल्यावर आणि दव पडल्यावर ती फलंदाजीसाठी योग्य झाली आणि अशा खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारतीय संघाने सर्वबाद २४० धावा केल्या आणि हे आव्हान ऑस्ट्रेलियाने ४२व्या षटकांतच पार केलं. ट्रेव्हिस हेड या सलामीवीराने शतक झळकावलं. (ICC ODI World Cup)
आयसीसीसाठी खेळपट्टीचा शेरा हे सामनाधिकारी मारतात. अंतिम सामन्यासाठी ही भूमिका बजाावली ती झिंबाब्वेचे माजी कसोटीपटू अँडी पायक्रॉफ्ट यांनी आणि ईडन गार्डन्सवरील उपांत्य सामन्याचे सामनाधिकारी होते जवागल श्रीनाथ. (ICC ODI World Cup)
(हेही वाचा – GST Amendment Bill : जीएसटी सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर)
खासकरून अंतिम सामन्यासाठीच्या खेळपट्टीवर अनेकांनी टीका केली होती. विश्वचषकासारख्या स्पर्धेत दोन्ही संघांना समसमान संधी असावी आणि खासकरून फलंदाज आणि गोलंदाजांनाही सारखी संधी असावी असा संकेत आहे. पण, अंतिम सामन्यात संथ खेळपट्टीमुळे सामना रंगू शकला नाही. (ICC ODI World Cup)
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सामन्यापूर्वीच खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. तर माजी कसोटीपटू रिकी पाँटिंगने स्वत:च रचलेल्या सापळ्यात भारत स्वत:च अडकला, असं खेळपट्टीचं वर्णन केलं. (ICC ODI World Cup)
विशेष म्हणजे भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या पहिल्या उपान्त्य सामन्यासाठीच्या खेळपट्टीवर सामन्या आधीच बरीच चर्चा रंगली होती आणि न्यूझीलंडने यजमान देश असलेल्या भारतावर एक दिवस आधी खेळपट्टी बदलून घेतल्याचा आरोप केला होता. पण, मुंबईच्या वानखेडे मैदानावरील ही खेळपट्टी खेळण्यायोग्य असल्याचा शेरा सामनाधिकाऱ्यांनी मारला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community