ICC Player of the Month : जसप्रीत बुमरा, स्मृती मंधाना आयसीसीचे जून महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू 

ICC Player of the Month : यावेळी महिला, पुरुष अशा दोन्ही गटात भारतीय खेळाडूच सर्वोत्तम ठरले आहेत.

128
ICC Player of the Month : जसप्रीत बुमरा, स्मृती मंधाना आयसीसीचे जून महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू 
  • ऋजुता लुकतुके 

भारताचा आघाडीचा तेज गोलंदाज जसप्रीत बुमरा महिलांमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गाजवणारी स्मृती मंधाना हे दोघे भारतीय आयसीसीचे जून महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरले आहेत. या टी-२० विश्वचषक स्पर्धेतही ४.१७ धावांच्या धावगतीने १५ बळी मिळवत बुमरा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. आता आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या यादीतही रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानच्या रहमनुल्ला गुरबाझ यांना मागे टाकत बुमरा अव्वल ठरला आहे. (ICC Player of the Month)

टी-२० विश्वचषकात अचूक आणि भेदक गोलंदाजी करत बुमराने ९ सामन्यांत १५ बळी मिळवले ते ८.२३ धावांच्या सरासरीने आणि ते ही षटकामागे फक्त ४.१७ धावा देत. आयर्लंड विरुद्ध ६ धावांमध्ये ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. (ICC Player of the Month)

(हेही वाचा – Wimbledon 2024 : यानिक सिन्नरला पराभवाचा धक्का, मेदवेदेव उपांत्य फेरीत)

‘मागचे काही आठवडे मी आणि भारतीय संघासाठी संस्मरणीय ठरले आहेत. सांघिक कामगिरीबरोबरच वैयक्तिकरित्या भारतीय खेळाडू पुरस्कार मिळवत असल्याचं बघून बरं वाटतंय. मला आयसीसीने दिलेल्या महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी मी ईश्वर आणि आयसीसीचा ऋणी राहीन. रोहित शर्मा आणि रहमनुल्ला यांना मागे टाकून मी पुरस्कार पटकावला असला, तरी त्यांच्या कामगिरीबद्दल मला आदरच आहे,’ असं पुरस्कार पटकावल्यावर बुमरा म्हणाला. (ICC Player of the Month)

तर महिलांमध्ये भारताचीच स्मृती मंधाना सर्वोत्तम ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गाजवताना स्मृतीने दोन सलग शतकं झळकावली. (ICC Player of the Month)

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्मृतीने तीन सामन्यांत अनुक्रमे ११३, १३६ आणि ९० धावा केल्या. त्यानंतर चेन्नई कसोटीतही भारतीय संघाने पहिल्या डावात ६०३ अशी विशाल धावसंख्या उभारली. त्यातही मंधानाचा वाटा १४९ धावांचा होता. या घडीला महिला क्रिकेटमधील आघाडीची फलंदाज अशी तिची ओळख आहे. (ICC Player of the Month)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.