-
ऋजुता लुकतुके
विश्वचषकातील साखळी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणारा रचिन रविंद्रला ऑक्टोबर २०२३ साठीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू होण्याचा मान मिळाला आहे. ही कामगिरी करताना त्याने चक्क जसप्रीत बुमरा आणि क्विंटन डी कॉकला मागे टाकलं आहे. (ICC Player of the Month)
न्यूझीलंडचा युवा क्रिकेटपटू रचिन रविंद्र ऑक्टोबर २०२३ साठीचा सर्वोत्तम आयसीसी क्रिकेटपटू ठरला आहे. विश्वचषकातील साखळी सामन्यांतील कामगिरीमुळे अर्थातच त्याला हा मान मिळाला आहे. सध्या रचिन विश्वचषकातील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. (ICC Player of the Month)
या पुरस्कारासाठी रचिनने भारताचा जसप्रीत बुमरा आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकला मागे टाकलं आहे. न्यूझीलंडच्या डावाची आक्रमक सुरुवात करून देण्याचं श्रेय रचिनलाच जातं. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात रचिनने गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध १२३ धावा केल्या होत्या आणि तिथपासून त्याच्या कामगिरीची दखल आंतरराष्ट्रीय जगताने घेतली आहे. (ICC Player of the Month)
Rachin Ravindra mesmerised the world with his phenomenal performance at #CWC23, earning him the ICC Men’s Player of the Month award 🏅
Details 👉 https://t.co/pht5clrQr5 pic.twitter.com/rRdQZzQEYz
— ICC (@ICC) November 10, 2023
(हेही वाचा – Rachin Ravindra Visited Native Place : भारतीय वंशाचा रचिन रवींद्रच्या आजीने जेव्हा त्याची दृष्ट काढली)
२३ वर्षीय रचिनने इंग्लंड पाठोपाठ ऑस्ट्रेलिया विरुद्धही शतक ठोकताना ११६ धावा केल्या होत्या. धरमशालावर त्याने केलेलं हे शतक ८९ चेंडूंमध्ये केलेलं होतं आणि त्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या ३८८ धावांचा पाठलाग करताना किवी संघ या धावसंख्येच्या जवळ पोहोचू शकला होता. (ICC Player of the Month)
नेदरलँड्स (५१) आणि भारत (७५) अशी दोन अर्धशतकंही त्याच्या नावावर आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत त्याने ९ सामन्यांत ५६५ धावा कुटल्या आहेत त्या ७० च्या सरासरीने. त्यामुळे क्विंटन डी कॉक आणि विराट कोहलीच्या पुढे फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. (ICC Player of the Month)
रचिन रविंद्र हा भारतीय वंशाचा किवी क्रिकेटपटू आहे आणि त्याच्या वडिलांनी त्याचं नाव राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांचं नाव जोडून ठेवलं आहे. (ICC Player of the Month)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community