ICC टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रविवारी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. परंतु या सामन्यावर पावसाचे सावट आहे. यामुळे क्रिकेटप्रेमींचे टेन्शन वाढले आहे. आता अचानक पाऊस पडला तर कोण जिंकणार याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
पाऊस पडला तर कोण जिंकणार? ICC ने स्पष्ट केले नियम
मेलबर्न क्रिकेट मैदानात होणाऱ्या लढतीच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नियमात काही बदल केले आहेत. आवश्यकता भासल्यास हे नियम लागू केले जाणार आहेत. १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवला आहे. जर १३ तारखेला सामना झाला नाही तर १४ तारखेला होईल.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारी मेलबर्नमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. जर मॅचच्या दिवशी पाऊस पडला तर सामना दुसरा दिवशी होईल. टॉस झाला तरचं सामना सुरू झाला असे मानले जाईल. डिआरएसचा नियम लागू होण्यासाठी किमान दोन्ही संघांनी १० ओव्हर खेळणे गरजेचे आहे. आता आयसीसीने लढतीच्या २४ तास आधी नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.
( हेही वाचा : T20 World Cup : सेमीफायनल सामन्यात पराभूत होऊन सुद्धा, भारताला मिळाले ‘एवढ्या’ रुपयांचे बक्षीस!)
ICC ने दिलेल्या माहितीनुसार, मॅच रविवारी पूर्ण व्हावी असा आमचा प्रयत्न आहे पण राखीव दिवस वापरण्याची वेळ आली तर दुसऱ्या दिवशी मॅच लवकर सुरू होईल. सलग दोन दिवस पावसाची ९० टक्के शक्यता असल्याने क्रिकेट चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फिरू शकते. दोन्ही दिवशी पाऊस पडल्यास, दोन्ही संघांना संयुक्त विजेत म्हणून घोषित करण्यात येईल.
एकदा नाणेफेक झाल्यानंतर सामना सुरू झाल्याचे मानण्यात येईल. स्पर्धेच्या नियमानुसार, राखीव दिवस दिला असला तरी निर्धारित दिवशी सामना पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ICC ने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community