ICC Suspends Sri Lanka Cricket : आयसीसीकडून श्रीलंकन क्रिकेट मंडळ निलंबित, सरकारी हस्तक्षेपामुळे कारवाई

आयसीसीने श्रीलंकन क्रिकेट मंडळावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे लंकन संघावर याचा परिणाम होणार जाणून घेऊया…

143
ICC Lifts Ban on Sri Lanka : आयसीसीने श्रीलंकन क्रिकेट मंडळावरील बंदी हटवली
ICC Lifts Ban on Sri Lanka : आयसीसीने श्रीलंकन क्रिकेट मंडळावरील बंदी हटवली
  • ऋजुता लुकतुके

आयसीसीने श्रीलंकन क्रिकेट मंडळावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे लंकन संघावर याचा परिणाम होणार जाणून घेऊया… (ICC Suspends Sri Lanka Cricket)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने श्रीलंकन क्रिकेट बोर्डावर निलंबनाची कारवाई केली आहे आणि हे निलंबन त्वरित लागू होणार आहे. श्रीलंकन क्रिकेटमध्ये तिथल्या सरकारच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय तातडीने घेण्यात आला. (ICC Suspends Sri Lanka Cricket)

‘आयसीसीचं कार्यकारी मंडळ शुक्रवारी भेटलं तेव्हा श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या भवितव्यावर चर्चा झाली. आयसीसीचं सदस्यत्व टिकवण्यासाठी असलेल्या महत्त्वाच्या अटींचं पालन श्रीलंकन क्रिकेटकडून होत नाही. राष्ट्रीय क्रिकेट नियामक संस्था स्वायत्त असावी आणि त्यात सरकारी हस्तक्षेप नको, ही आयसीसीची पहिली अट आहे. तिचं पालन होत नसल्यामुळे आयसीसीने श्रीलंकन क्रिकेट निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असं आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. (ICC Suspends Sri Lanka Cricket)

श्रीलंकेत मागच्या आठवड्यात क्रिकेटच्या बाबतीत अनेक घटना घडल्या आहेत. तिथल्या संसदेत श्रीलंकन क्रिकेटची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा ठराव झाला. सरकारी पक्ष आणि विरोधी पक्ष अशा दोघांनी या ठरावाला पाठिंबा दिला. श्रीलंकन क्रिकेटवर सरकारने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. (ICC Suspends Sri Lanka Cricket)

(हेही वाचा – Indrayani River Pollution : पवित्र इंद्रायणी नदी कि हिमनदी; प्रशासनाविषयी व्यक्त होतोय संताप)

तर याच आठवड्यात सुरुवातीला श्रीलंकन क्रीडामंत्र्यांनी श्रीलंकन क्रिकेटच्या व्यवस्थापकीय समितीला बरखास्त करून माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाच्या अध्यक्षतेखाली एक नवी समिती बसवली होती. (ICC Suspends Sri Lanka Cricket)

हाच सरकारी हस्तक्षेप आयसीसीला मान्य नाही. सध्या श्रीलंकन क्रिकेटवर निलंबनाची कारवाई झाली आहे आणि ती ताबडतोबीने लागू केली जाईल. पण, लंकन खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतील का, किंवा कसे खेळू शकतील याचा निर्णय पुढील बैठकीत होणार आहे. (ICC Suspends Sri Lanka Cricket)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.