-
ऋजुता लुकतुके
टी-२० प्रकारात भलत्याच फॉर्ममध्ये असलेल्या तिलक वर्माने आयसीसीच्या टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी मुसंडी मारताना थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर गोलंदाजांमध्ये वरुण चक्रवर्तीही पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. अलीकडे इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत दोघंही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तिलक वर्माच्या पुढे असलेल्या ट्रेव्हिस हेड आणि वर्मा यांच्यात फक्त २३ गुणांचा फरक आहे. आणि इंग्लंडविरुद्ध सातत्यपूर्ण खेळ केला तर तिलक हे अंतरही भरून काढू शकतो. (ICC T-20 Ranking)
(हेही वाचा- Champions Trophy 2025 : आयसीसी सीईओंच्या राजीनाम्यामागे पाकिस्तानची अकार्यक्षमता? चॅम्पियन्स करंडकासाठी अपुऱ्या तयारीने गोंधळ )
या मालिकेत तिलक वर्माने आतापर्यंत नाबाद १९, नाबाद ७२ आणि १८ अशा धावा केल्या आहेत. पण, या आधीच्या मालिकेत त्याने दोन शतकं आणि १ अर्धशतक केलं आहे. एकदाही बाद न होता नाबाद ३३२ धावा करण्याचा विक्रमही त्याने अलीकडेच केला आहे. टी-२० च्या इतिहासात ४ डाव नाबाद राहून केलेल्या या सर्वोच्च धावा आहेत. (ICC T-20 Ranking)
TILAK VERMA BECOMES NO.2 RANKED BATTER IN THE WORLD IN ICC T20I RANKINGS.
– A Superstar in Making for India..!!!! 🇮🇳⭐ pic.twitter.com/AhO41do79n
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 29, 2025
ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड सध्या कसोटी क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे उर्वरित दोन टी-२० सामन्यांत तिलकने चांगली कामगिरी केली तर तो हेडला निश्चित मागे टाकू शकतो. आणि तसं झालं तर टी-२० प्रकारात अव्वल स्थान पटकावणारा तो वयाने सर्वात तरुण खेळाडू असेल. यापूर्वी हा मान पाकिस्तानच्या बाबर आझमने २३ व्या वर्षी मिळवला होता. तर तिलक वर्मा २२ वर्षांचा आहे. सध्या त्याने ८३२ गुण आहेत. भारतासाठी ही चौथी मोठी कामगिरी आहे. यापूर्वी सूर्यकुमार यादव, विराट कोहली आणि के. एल. राहुल या तीनच फलंदाजांनी आयसीसी क्रमवारीत तिलकपेक्षा जास्त गुण पटकावले आहेत. (ICC T-20 Ranking)
(हेही वाचा- GBS : आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसची एन्ट्री; सहा रुग्णांना लागण)
गोलंदाजांमध्ये भारताच्या वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्ध राजकोटला ५ बळी मिळवून क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. आता तो पाचव्या स्थानावर आहे. तर भारताचा आणखी एक फिरकीपटू अक्षर पटेल सध्या अकराव्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांमध्ये इंग्लंडचा आदील रशिद अव्वल स्थान राखून आहे. (ICC T-20 Ranking)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community