ICC T20 Rankings : अभिषेक शर्मा ३८ स्थानांची झेप घेऊन आयसीसी क्रमवारीत थेट दुसऱ्या स्थानावर 

41
ICC T20 Rankings : अभिषेक शर्मा ३८ स्थानांची झेप घेऊन आयसीसी क्रमवारीत थेट दुसऱ्या स्थानावर 
ICC T20 Rankings : अभिषेक शर्मा ३८ स्थानांची झेप घेऊन आयसीसी क्रमवारीत थेट दुसऱ्या स्थानावर 
  • ऋजुता लुकतुके 

इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका आपल्या घणाघाती फलंदाजीने गाजवणाऱ्या डावखुऱ्या अभिषेक शर्माने आयसीसीच्या क्रमवारीतही मोठी झेप घेतली आहे. या मालिकेनंतर ३८ स्थानांनी वर चढत अभिषेक थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावरील ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक यांच्यात आता फक्त २६ गुणांचा फरक आहे. ही किमया अभिषेकने केली ती इंग्लंड विरुद्ध मुंबईत अभिषेकने केलेल्या ५४ चेंडूंत १३४ धावांच्या खेळीनंतर. या खेळीसह टी-२० प्रकारात भारताकडून सगळ्यात मोठी वैयक्तिक धावसंख्या रचण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे. या मालिकेत त्याने एक शतक आणि एक वेगवान अर्धशतकही ठोकलं आहे. (ICC T20 Rankings)

(हेही वाचा- युद्धग्रस्त गाझा पट्टीचा ताबा अमेरिका घेईल; Donald Trump यांची घोषणा)

टी-२० संघात सलामीवीर म्हणून त्याने आपली जागा आता जवळ जवळ पक्की केली आहे. शिवाय ताज्या क्रमवारीत भारतीय संघाचा टी-२० प्रकारात असलेला दबदबाही दिसून येतो. कारण, टी-२० क्रमवारीत पहिल्या ५ फलंदाजांमध्ये ३ नावं भारतीय आहेत. अभिषेकच्या पाठोपाठ तिलक वर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. तर सूर्यकुमार यादवही पाचव्या क्रमांकावर आहे. (ICC T20 Rankings)

 गोलंदाजांच्या क्रमवारीतही भारताच्या वरुण चक्रवर्तीने अशीच झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांत १४ बळी घेऊन वरुणही दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. आदील रशिदसह वरुण आता विभागून दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे पहिल्या ६ क्रमाकांमध्ये फिरकीपटूंचंच वर्चस्व दिसत आहे. वेस्ट इंडिजचा अकील हुसेन पहिल्या, इंग्लंडचा आदील रशिद व वरुण दुसऱ्या स्थानावर आहेत. रवी बिश्नोईही कामगिरीतील सातत्यामुळे आता सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. (ICC T20 Rankings)

 अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही भारतीय खेळाडू आपलं वर्चस्व टिकवून आहेत. इथं हार्दिक पांड्या अव्वल आहे. तर त्या खालोखाल अक्षर पटेल अकराव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे इथंही अभिषेक शर्मा तेराव्या स्थानावर आहे. अभिषेकने इंग्लंडविरुद्ध पाचव्या टी-२० सामन्यांत ५४ चेंडूंत १३४ धावांच्या खेळीसह गोलंदाजीवर दोन बळीही मिळवले होते. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत शिवम दुबेनंही आगेकूच केली आहे. (ICC T20 Rankings)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.