ICC T20 Ranking : भारताच्या ‘या’ गोलंदाजाची आयसीसी रॅंकिंगमध्ये मोठी झेप; विश्वचषकातील कामगिरीचा फायदा

ऑस्ट्रेलियामध्ये नुकतीच टी२० विश्वचषक स्पर्धा संपन्न झाली, भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने या संपूर्ण विश्वचषकात चांगली कामगिरी केली. या स्पर्धेतील सहा सामन्यांमध्ये त्याने १० विकेट्स घेतल्या याचा फायदा अर्शदीपला झाला असून त्याने टी२० रॅंकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. अर्शदीप अगदी कमी कालावधीत रॅकिंगमध्ये २२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

( हेही वाचा : सिंहगडावर २१ नोव्हेंबरपासून नवे नियम; गडावर ‘या’ वस्तू घेऊन गेल्यास भरावा लागणार दंड)

इंग्लंडच्या या खेळाडूला प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार 

प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकल्यामुळे सॅम करनला आयसीसीच्या रॅंकिंगमध्ये मोठा फायदा झाला असून सॅन करन आता ११ व्या क्रमांकावर आहे. आयसीसी टी२० रॅंकिंगमध्ये शाहीन आफ्रिदी १८ व्या स्थानावर आलाय याआधी शाहीन ३८ व्या स्थानावर होता.

भारताचा युवा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर

दरम्यान, टी २० विश्वचषकाच्या अपयशानंतर भारताचा युवा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुलसह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या सध्या भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here