ऋजुता लुकतुके
भारताचा २३ वर्षीय लेगस्पिनर रवी बिश्नोईने आयसीसी टी-२० (ICC T20 Rankings) गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या मालिकेत बिश्नोई मालिकावीर ठरला होता. त्यानंतर त्याने अफगाणिस्तानच्या राशिद खानला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला.
बिश्नोईचे आता ६९९ रेटिंग गुण झाले आहेत. तर राशिद खान ६९२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचे वानिंदू हसरंगा आणि इंग्लंडचा आदील रशिद हे संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत. या दोघांचे ६७९ रेटिंग गुण आहेत. विशेष म्हणजे यंदा पहिले ५ गोलंदाजा हे फिरकी गोलंदाज आहेत.
भारताचा रवी बिश्नोई हा गोलंदाजांच्या यादीत पहिल्या दहातील एकमेव गोलंदाज आहे. दुखापतीतून नुकताच सावरलेला अक्षर पटेल ९ स्थानांच्या बढतीसह अठराव्या स्थानावर पोहोचला आहे.
Ravi Bishnoi rises to take the 🔝 spot in the latest @MRFWorldWide ICC Men’s Player Rankings!
More ➡ https://t.co/YqBILN6QL1 pic.twitter.com/rJO4DzDKVM
— ICC (@ICC) December 6, 2023
फलंदाजीत भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादवने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. तर सलामीवीर ऋतुराज गायकवाड या यादीत आता सातव्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्या अव्वल आहे.
रवी बिश्नोईचा भारतीय क्रिकेटमधील उदय हा संघासाठी (ICC T20 Rankings) आशादायी मानला जातोय. आणि तीनही प्रकारात दीर्घकाळ खेळू शकेल असा फिरकीपटू भारताला मिळाला असल्याचा तज्जांचाही आशावाद आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community