भारत विरूद्ध नेदरलॅंड सामना सिडनी येथे खेळवला गेला. नेदरलॅंड्सवर भारताने सहज विजय मिळवला. रोहित शर्मासह, विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी खेळी करत नेदरलॅंड्सला १८० धावांचे आव्हान दिले. यानंतर भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग व आर अश्विन यांनी गोलंदाजीत कमाल केली.
( हेही वाचा : उबेर चालक फोनवर बोलण्यात व्यस्त अन् महिलेचा विमान प्रवास हुकला, २० हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश)
गुणतालिकेत अव्वल स्थानी ‘भारत’
या विजयासह भारत ग्रुप २ च्या गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवत ३ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. या खालोखाल अनुक्रमे बांगलादेश, झिम्बाब्वे, पाकिस्तान, नेदरलॅंड हे संघ आहेत.
सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आल्यावर भारताने १७९ धावा स्कोरबोर्डवर लावल्या. भारताच्या ४ फलंदाजांनी फलंदाजी केली. राहुल ९ धावा करत बाद झाल्यावर. कर्णधार रोहितने ३९ चेंडूत ५३ धावा, विराटने ४४ चेंडूत नाबाद ६२ धावा आणि सूर्यकुमारने २५ चेंडूत ५१ धावा केल्या. सूर्यकुमार आणि विराटने नाबाद ९५ धावांची भागिदारी केली. या विजयासह भारताच्या नावावर ४ गुण झाले असून भारताचा नेट रनरेटही +1.425 झाला आहे.
Join Our WhatsApp Community