ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या पाहून भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.
( हेही वाचा : बिहारमधील अजब प्रकार; परीक्षा ओळखपत्रांवर विद्यार्थ्यांच्या फोटोऐवजी झळकले पंतप्रधान मोदी, धोनीचे फोटो )
ICC T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिपक हुडा, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल , अर्शदीप सिंग व आर अश्विन
स्टॅंड बाय- मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई आणि दिपक चहर
One title 🏆
One goal 🎯
Our squad 💪🏻#TeamIndia | #T20WorldCup pic.twitter.com/Dw9fWinHYQ— BCCI (@BCCI) September 12, 2022
बुमराहचे पुनरागमन
आशिया चषकामध्ये भारतीय संघाने अनेक प्रयोग केले यामध्ये खेडाळूंची चाचपणी घेणे हे प्रमुख ध्येय होते. रवींद्र जडेजा हा भारताचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू असल्याचे समजले जाते. परंतु त्याच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाल्याने तो या विश्वचषकात खेळू शकणार नाही. तर जसप्रीत बुमराहचे या संघात पुनरागमन झाले आहे.
पहिला सामना केव्हा होणार?
भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरूद्ध भारतीय संघ २३ ऑक्टोबरला आपला पहिला सामना खेळेल. T20 विश्वचषक २२ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. पहिला सामना मेलबर्न येथे खेळवला जाईल.
Join Our WhatsApp Community