‘टी २०’ विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर! भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी २० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. हे सामने ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणार आहे. विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान हे संघ असणार आहेत. तसेच श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड हे चार संघ १६ ऑक्टोबरपासून पात्र ठरण्यासाठी खेळणार आहेत. यामधून निवडलेल्या दोन संघांना सुपर १२ मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

( हेही वाचा : …म्हणून सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा )

संपूर्ण स्पर्धेत भारत एकूण पाच सामने खेळणार असून भारताचा पहिलाच सामना प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. याआधी २०२१ मध्ये टी २० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आले होते. त्या सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाला पराभूत केले होते. भारतीय टीम पाकिस्तान, बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका आणि अन्य दोन क्वालिफायर टीमसह ग्रुप २ मध्ये आहे.

भारत खेळणारे सामने

  • २३ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान (मेलबर्न)
  • २७ ऑक्टोबर – भारत विरुद्ध ग्रुप ए रनर-अप (सिडनी)
  • ३० ऑक्टोबर – भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (पर्थ)
  • २ नोव्हेंबर – भारत विरुद्ध बांग्लादेश (अॅडलेड)
  • ६ नोव्हेंबर – भारत विरुद्ध ग्रुप बी विजेता (मेलबर्न)

( हेही वाचा : सरकारी नोकरी अपडेट! ‘या’ विभागात होणार ‘२७७६’ पदांची भरती! )

मेलबर्न येथे अंतिम सामना आणि टी २० विश्वचषकाचे इतर सामने अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी याठिकाणी खेळवले जाणार आहेत. विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे. दरम्यान विश्वचषक सामन्यांसाठी तिकिटांची विक्री ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून या काळात कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन करावे लागणार आहे. टी २० विश्वचषक स्पर्धेचा हा आठवा हंगाम असेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here