- ऋजुता लुकतुके
दक्षिण आफ्रिकेवर २८१ धावांनी मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर न्यूझीलंडला त्याचा दुहेरी फायदा झाला आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आता न्यूझीलंडचा संघ भारत आणि ऑस्ट्रेलियाला मागे टाकून अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. माऊंट माँगेन्यूला झालेली कसोटी जिंकून न्यूझीलंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने न्यूझीलंडने पहिलं मोठं पाऊल टाकलं आहे. (ICC Test Championship 2024-25)
न्यूझीलंडचे आता ६६.६६ रेटिंग गुण झाले आहेत. नवीन कसोटी अजिंक्यपदाचा हंगाम सुरू झाल्यापासून न्यूझीलंड संघ फक्त ३ कसोटी सामने खेळला आहे. यात बांगलादेश बरोबरची मालिका त्यांनी बरोबरीत सोडवली. तर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांनी मोठा निर्णायक विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांचे रेटिंग गुण वाढून त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि भारताला मागे टाकलं. (ICC Test Championship 2024-25)
🇳🇿 NEW ZEALAND ARE NO.1️⃣🎉
Victory over Pakistan has sent Kane Williamson’s side to the 🔝 of the @MRFWorldwide ICC Test Team Rankings!
They have achieved the feat for the first time in rankings history 👏 pic.twitter.com/8lKm6HebtO
— ICC (@ICC) January 6, 2021
(हेही वाचा – Jasprit Bumrah : आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल ठरलेला जसप्रीत बुमरा पहिला भारतीय तेज गोलंदाज)
न्यूझीलंड संघाने कसोटीवर वर्चस्व मिळवलं
दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगमुळे आफ्रिकन क्रिकेट मंडळाने दुय्यम खेळाडूंचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर पाठवला आहे. त्यामुळे न्यूझीलंडसाठी ही कसोटी मालिका सोपी ठरेल असं बोललं जात आहे. (ICC Test Championship 2024-25)
कसोटी क्रमवारीत आता ऑस्ट्रेलियाचा संघ आता दुसऱ्या क्रमांकावर तर भारतीय संघ तिसरा आहे. याउलट दक्षिण आफ्रिकेचा संघ मोठ्या पराभवानंतर सातव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. बांगलादेश, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचे संघही आता आफ्रिकेच्या पुढे आहेत. (ICC Test Championship 2024-25)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयात केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र चमकले. विल्यमसनने दोन्ही डावांत शतकं केली. तर रचिनने द्विशतक ठोकलं. त्यामुळे तिसऱ्याच दिवशी न्यूझीलंड संघाने कसोटीवर वर्चस्व मिळवलं होतं. चौथ्या दिवशी काईल जेमिसनने आपल्या गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना जेरीला आणलं. आणि आफ्रिकन डाव २४७ धावांत आटोपला. (ICC Test Championship 2024-25)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community