ICC Test Championship 2027 : २०२७ ची कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरी पुन्हा इंग्लंडमध्ये

ICC Test Championship 2027 : २०२७ ची कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरी पुन्हा इंग्लंडमध्ये

213
ICC Test Championship 2027 : २०२७ ची कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरी पुन्हा इंग्लंडमध्ये
ICC Test Championship 2027 : २०२७ ची कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरी पुन्हा इंग्लंडमध्ये
  • ऋजुता लुकतुके

२०२७ च्या कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी जून महिन्यात इंग्लंडमध्ये होणार आहे. सलग चौथ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी इंग्लंडमध्येच होईल. २०२१ मध्ये साऊदॅम्पटन, २०२३ मध्ये ओव्हल, सध्या सुरू असलेल्या हंगामाची अंतिम फेरी २०२५ मध्ये लॉर्ड्सला होणार आहे. आता २०१७ ची अंतिम फेरीही लॉर्ड्सवरच होणार आहे. आयसीसीने शुक्रवारी २०२४ ते २०२७ पर्यंतचा क्रिकेट कार्यक्रम जाहीर केला आहे. आणि त्यातून ही माहिती समोर आली आहे. (ICC Test Championship 2027)

यापूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या दोन अंतिम सामन्यात भारताचा एकदा न्यूझीलंड आणि दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव झाला होता. २०२३ मध्ये ओव्हलवर झालेल्या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने अंतिम फेरी सतत इंग्लंडमध्ये आणि ते ही जूनमध्ये घेण्यावरून नाराजी व्यक्त केली होती. त्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने २०९ धावांनी पराभव केला होता. (ICC Test Championship 2027)

(हेही वाचा – Mary Kom Not Retired : मेरी कोमने निवृत्तीची बातमी फेटाळली)

भारताच्या या मताची आयसीसीने घेतली नाही दखल

आयपीएलनंतर लगेच कसोटी अजिंक्यपद स्पर्धा होत असल्यामुळेही रोहित नाराज होता. ‘आयपीएलची अंतिम फेरी झाल्या झाल्या कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरी का होते? ती मार्चमध्ये का होत नाही? आणि ती इंग्लंडमध्येच का होते? इंग्लंड बाहेर कुठेही होऊ शकतेच की?’ अशी तिखट प्रतिक्रिया रोहितने तेव्हा दिली होती. (ICC Test Championship 2027)

भारतीय संघाला दोन्ही वेळा इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेण्याची संधीच मिळाली नाही, असा आरोप इतरांकडूनही झाला होता. सरावाची फारशी संधी न मिळता अंतिम फेरी खेळावी लागली आणि त्यातच दोन्ही अंतिम फेऱ्यांमध्ये भारताचा दारुण पराभव झाला. आताही भारताच्या या मताची आयसीसीने दखल घेतलेली नाही. आयसीसीचा हा कार्यक्रम अंतिम नाही. पण, तसा प्रस्ताव जरुर आहे. (ICC Test Championship 2027)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.