- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने नुकतीच न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. तब्बल १८ मालिका विजयांची परंपरा या पराभवामुळे मोडीत निघाली हे दु:ख तर आहेच. शिवाय या पराभवामुळे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचं वर्चस्वही काहीसं ढिलं पडलं आहे. भारतीय संघ आता यशाच्या टक्केवारीत ऑस्ट्रेलियापेक्षा फक्त ०.३२ गुणांनी पुढे आहे. हा पराभव भारताचा हंगामातील चौथा पराभव होता. भारतीय संघाचे आता ६२.८२ गुण आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाचे ६२.५० गुण आहेत. (ICC Test Championship)
(हेही वाचा – Vijaykumar Vyshak : भारतीय संघात विजयकुमार व्यक्ष, रमणदीप हे नवीन चेहरे)
महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघासाठी या हंगामातील ही शेवटची मायदेशातील मालिका होती. न्यूझीलंड विरुद्ध आता एकमेव कसोटी शिल्लक आहे. आणि त्यानंतर भारतासमोर आव्हान आहे ते ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला सामोरं जाण्याचं. बोर्डर-गावस्कर चषकासाठी दोन्ही संघांदरम्यान ५ कसोटी सामने होणार आहेत आणि ऑस्ट्रेलियात जिंकणं हे भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक ठरत आलं आहे. त्यामुळे एकंदरीतच भारतीय संघाचं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान खडतर झालं आहे. (ICC Test Championship)
(हेही वाचा – NCP शरदचंद्र पवार गटाची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; उबाठाच्या विरोधात उमेदवार दिला)
यशाच्या टक्केवारीवर आधारित ही गुणतालिका आहे आणि यातील पहिले दोन संघ अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरतात. यापूर्वी दोन स्पर्धांमध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत तर पोहोचला. पण, दोन्ही वेळा भारताला उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं होतं. तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकन संघ आहे आणि त्यांची यशाची टक्केवारी ५५.५६ अशी आहे. तर भारतावर मालिका विजय मिळवल्यामुळे न्यूझीलंडचा संघ या तालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांचे गुण आहेत ५० टक्के. त्यांना आता मायदेशात इंग्लंड विरुद्ध ३ कसोटींची मालिका खेळायची आहे. त्यामुळे सध्या या तालिकेत भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांना समसमान संधी दिसत आहे. (ICC Test Championship)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community