-
ऋजुता लुकतुके
कसोटी क्रिकेटमध्ये सध्या चुरस आहे ती कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीसाठी. जूनमध्ये होणाऱ्या कसोटीसाठी आयसीसी क्रमवारीतील पहिले दोन संघ पात्र ठरणार आहेत. ती संधी भारतासह चार देशांना आहे. दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर आहे. त्या खालोखाल ऑस्ट्रेलिया, भारत आणि श्रीलंकेलाही अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. भारताचं भवितव्य बोर्डर – गावसकर मालिकेतील उर्वरित दोन कसोटी ठरवणार आहेत. शिवाय भारताला दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियन संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल. (ICC Test Championship)
(हेही वाचा- Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यासाठी आणखी ३४ विशेष गाड्या धावणार; ‘असे’ असेल वेळापत्रक)
भारतासाठी ही मालिका अखेरची संधी आहे. तर इतर तीनही देश आणखी एक – एक मालिका खेळणार आहेत. भारताने बोर्डर – गावसकर मालिका ३-१ ने जिंकली तर अंतिम फेरीचा त्यांचा मार्ग सोपा होईल. कारण, भारतीय विजयाचा अर्थ ऑस्ट्रेलियाचा पराभव असाही आहे. पण, तसं झालं नाही तर भारताला इतर मालिकांच्या निर्णयावर अवलंबून राहावं लागेल. (ICC Test Championship)
A stalemate at the Gabba adds more intrigue to the #WTC25 Finale race 🤩
Latest state of play ➡ https://t.co/eb99aMpgXA pic.twitter.com/pJ81Eh5ilg
— ICC (@ICC) December 18, 2024
आता भारताच्या उर्वरित कसोटींचा निकाल कसा लागेल यावरून भारताच्या अंतिम फेरीच्या शक्यता काय आहेत ते समजून घेऊया, (ICC Test Championship)
(हेही वाचा- Rohit Sharma : रोहित शर्माला स्वत:च्या ढासळलेल्या फॉर्मविषयी काय वाटतं?)
भारताने उर्वरित दोनही कसोटी जिंकल्या तर भारताची यशाची टक्केवारी ६०.७३ वर जाईल. आणि ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध पराभव आणि श्रीलंकेविरुद्ध विजय गृहित धरला, तर त्यांची टक्केवारी ५७.०२ इतकी राहील. याचा अर्थ भारत ऑस्ट्रेलियाच्या पुढे असेल. अशा परिस्थितीत भारत आणि द आफ्रिका अंतिम फेरीत पोहोचतील. (ICC Test Championship)
भारताने १ कसोटी जिंकली आणि दुसरी अनिर्णित राहिली, तर भारताची यशाची टक्केवारी ५७.०२ असेल. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला २-० असं हरवलं तर ते ५८.७७ टक्केवारीसह पुढे जातील. मग दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम लढत होईल. (ICC Test Championship)
(हेही वाचा- विधान परिषदेच्या सभापतीपदी Ram Shinde; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “प्राध्यापक राम शिंदे हे…”)
आता सगळ्या शक्यता बघूया,
१. भारताने मालिका २-१ ने जिंकली – ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धची मालिका किमान १-० फरकाने जिंकायला हवी. किंवा दक्षिण आफ्रिकाही पाकिस्तानविरुद्ध किमान ०-१ फरकाने हरली पाहिजे.
२. मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली – भारतीय संघाची यशाची टक्केवारी ५५.२६ अशी असेल. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धची मालिका किमान ०-१ ने गमवावी लागेल. तर भारताला अंतिम फेरीत पोहोचता येईल. किंवा आफ्रिकन संघाला पाकिस्तानविरुद्ध ०-२ असा पराभव पत्करावा लागेल.
३. मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली – तर दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तान विरुद्धची मालिका ०-२ अशी हरावी लागेल. किंवा ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धची मालिका किमान ०-१ ने हरावी लागेल. अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे समसमान गुण होतील. पण, भारताने जास्त मालिका जिंकलेल्या असल्यामुळे ते पुढे जातील. पण, त्याचवेळी श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला २-० ने हरवलं, तर ते भारताच्या पुढे जातील आणि अंतिम फेरीत त्यांचा मुकाबल दक्षिण आफ्रिकेशी होईल.
४. भारताने मालिका १-२ ने गमावली – भारताने मालिकाच गमावली तर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात येईल. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अंतिम फेरी गाठतील. श्रीलंकेनं ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका जिंकली, तर ते ही भारताच्या पुढे जातील.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community