- ऋजुता लुकतुके
दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेविरुद्धची किंग्जमेड कसोटी २३३ धावांनी जिंकली आणि त्यामुळे आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पुन्हा एकदा रंगत निर्माण झाली आहे. आफ्रिकन संघ आता ऑस्ट्रेलियाला मागे टाकून थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर लंकन संघाचं आव्हान थोडं कठीण झालं आहे. आफ्रिकन संघ आधीच बांगलादेश विरुद्ध २-० असा विजय मिळवून विजयाच्या मार्गावर परतला आहे. आता श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्धच्या मालिकांमध्ये त्यांना मायदेशात खेळण्याचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे अंतिम फेरीसाठी त्यांची दावेदारी मजबूत झाली आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलियन संघांचं भवितव्य बोर्डर-गावस्कर चषकावर ठरणार आहे.
किंग्जमेड कसोटीत मार्को यानसेनने दोन्ही डावांत मिळून १० बळी मिळवले. त्यातही दुसऱ्या डावातील ४२ धावांत ७ बळी ही त्याची कामगिरी निर्णायक ठरली. पहिल्या डावातही त्यांनी लंकन संघाला ४२ धावांत गुंडाळलं होतं. त्यातच दुसऱ्या डावात टेंबा बवुमा (११३) आणि ट्रिस्टियन स्टब्ज (१२२) यांनी २४९ धावांची भागिदारी रचत विक्रम रचला आणि त्यामुळे लंकन संघासमोर विजयासाठी ५१६ धावांचं अशक्यप्राय आव्हान येऊन ठेपलं.
(हेही वाचा – Hit and Run Case : मुलुंडमध्ये ‘हिट अँड रन’ ; महिलेचा मृत्यू, चालक फरार)
The Proteas wrap up a handsome win in Durban to take 1️⃣-0️⃣ lead in the two-Test series 🏏
📝 #SAvSL: https://t.co/dVkUTYXu2p #WTC25 pic.twitter.com/VkUfBjYtOY
— ICC (@ICC) November 30, 2024
आफ्रिकन संघाच्या या मोठ्या विजयामुळे कसोटी अजिंक्यपदाच्या क्रमवारीतही मोठे बदल झाले आहेत. आफ्रिकन संघ ५९.२६ अशा विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर भारत ६१.११ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाला अजूनही संधी आहे आणि ते ५७.६९ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर न्यूझीलंड, श्रीलंका आणि इंग्लंड यांची क्रमवारी लागले. पहिले दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
(हेही वाचा – Jay Shah ICC President : जय शाह यांनी आयसीसी अध्यक्षपदाचा स्वीकारला कार्यभार)
सध्याची संघांची स्थिती पाहूया,
दक्षिण आफ्रिका – सध्या ते दुसऱ्या स्थानावर आहेत. पण, श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्धच्या मायदेशातील मालिका जिंकल्या तर त्यांना अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीची चांगली संधी आहे.
भारत – भारतीय संघ सध्या ६१.११ टक्क्यांसह अव्वल आहे. पण, बोर्डर-गावस्कर चषकातील उर्विरत चार कसोटी भारताचं अजिंक्यपद स्पर्धेतील भवितव्य ठरवतील. ही मालिका गमावली तर भारताचं गणित बिघडून जाईल. त्यामुळे आता संघाने मालिकेत मिळवेली १-० आघाडी एकतर त्यांना टिकवावी लागेल आणि त्याहून चांगलं म्हणजे वाढवावी लागेल.
ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या क्रमांकावर घसरल्यामुळे त्यांच्यावर दडपण वाढलं आहे. त्यांना आता बोर्डर-गावस्कर चषकात चांगली कामगिरी करून भारताला नमवावंच लागेल. त्यांनी ही मालिका जिंकली आणि त्याचबरोबर गुणही कमावले, तर त्यांना कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची संधी आहे.
श्रीलंका – श्रीलंकन संघ आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर तिसऱ्यावरून पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. त्यांना आता मालिकेतील दुसरी कसोटी आणि त्यानंतर मायदेशात होणारी ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका यावर लक्ष केंद्रीत करावं लागेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community