-
ऋजुता लुकतुके
बोर्डर – गावसकर करंडक मालिका भारतीय संघाने १-३ अशी गमावली. आणि त्याचबरोबर आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतूनही संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. अजिंक्यपदाच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला किमान ही मालिका बरोबरीत सोडवायची होती. आणि त्यासाठी सिडनी कसोटी जिंकणं आवश्यक होतं. पण, या कसोटीत भारताचा तीनच दिवसांत पराभव झाला. (ICC Test Championship)
(हेही वाचा- कोविडसारख्याच HMPV वायरसमुळे महाराष्ट्र आरोग्य विभाग अलर्ट मोडवर; नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी)
आणि त्याचबरोबर कसोटी अजिंक्यपदाच्या भारताच्या आशा धुळीला मिळाल्या आहेत. या मालिकेत भारताने सुरुवातीची पर्थ कसोटी २९४ धावांनी जिंकली. पण, त्यानंतर संघाची कामगिरी घसरत गेली. आणि ॲडलेड, मेलबर्न आणि सिडनीतील पराभवाबरोबरच भारतीय संघाने ही मालिका गमावली. मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारताने ही सलग दुसरी मालिका गमावली. आहे. (ICC Test Championship)
Ready to defend their World Test Championship mace 👊
Australia qualify for the #WTC25 Final at Lord’s 🏏
More 👉 https://t.co/EanY9jFouE pic.twitter.com/xcpTrBOsB8
— ICC (@ICC) January 5, 2025
भारत आता २०२३-३५ कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच अंतिम फेरीत भारतीय संघ नसेल. याआधी दोन्ही वेळा भारतीय संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. पण यावेळी मात्र न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरोधातील मोठे पराभव संघाला महागात पडले आहेत. (ICC Test Championship)
२०२३-२५ हंगामात भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांची मालिका १-० अशी जिंकून भारताने सुरूवात केली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली. तर मायदेशात इंग्लंड विरुद्धची मालिका ४-१ ने जिंकून भारताने अजिंक्यपदाच्या शर्यतीत अव्वल क्रमांक पटकावला होता. त्यानंतर मायदेशातील बांगलादेश विरुद्धची मालिकाही भारताने २-० ने जिंकली. पण, त्यानंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातील पराभवांनंतर भारताचं अंतिम फेरीचं गणित बदललं. (ICC Test Championship)
(हेही वाचा- Palghar Earthquake : पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी परिसरात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण)
भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडलेला असतानाच, ऑस्ट्रेलियन संघाने आता अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. आणि जूनमध्ये लॉर्ड्समध्ये होणाऱ्या अंतिम फेरीत त्यांचा मुकाबला दक्षिण आफ्रिकेशी होईल. ऑस्ट्रेलिया विजेतेपद टिकवण्याचा प्रयत्न करेल. तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचली आहे. (ICC Test Championship)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community