-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्धची तिसरी मुंबई कसोटी २५ धावांनी गमावली. याचा परिणाम संघाच्या कसोटी अजिंक्यपदाच्या क्रमवारीवरही झाला आहे. एक तर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाच्या खाली दुसऱ्या क्रमांकावर सरकला आहे. भारताची पुढील मालिका ऑस्ट्रेलियात असल्यामुळे भारताचं आव्हानही खडतर झालं आहे. शिवाय भारताचा गेल्या २४ वर्षांतील हा पहिला मायदेशातील पराभव आहे. (ICC Test Championship)
आता कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतासमोरील आव्हान नेमकं काय आहे ते पाहूया, मायदेशात ०-३ ने व्हाईटवॉश मिळण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय संघाची यशाची टक्केवारी त्याने ६२.८० वरून ५८.३३ टक्क्यांवर घसरली आहे. पहिल्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाचे आहेत ६२.५० गुण. (ICC Test Championship)
आता भारताची या हंगामातील एकमेव मालिका बाकी आहे ती ऑस्ट्रेलिया विरुद्ध. नोव्हेंबर २२ पासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ५ कसोटी सामने खेळणार आहे. ही मालिका महत्त्वाची आहे कारण, सध्याचे दोन अव्वल संघ यात आमने यामने येणार आहेत. भारताला स्वत:च्या जीवावर निर्विवाद अव्वल स्थान पटकावायचं असेल तर या ५ पैकी ४ कसोटी जिंकणं अनिवार्य आहे. ही कामगिरी त्यांना ऑस्ट्रेलियातील आव्हानात्मक वातावरणात पार पाडावी लागणार आहे. (ICC Test Championship)
याउलट पहिल्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाला उर्वरित ७ कसोटींपैकी ४ जिंकाव्या लागतील. यातील ५ सामने घरच्या मैदानावर होणार आहेत. न्यूझीलंडने भारतात मिळवलेल्या ३-० मालिका विजयामुळे सध्या तो चौथ्या क्रमांकावर असले तरी त्यांच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा चांगल्याच पल्लवित झाल्या आहेत. त्यांचे ५४.५५ गुण झाले आहेत. तर ५५.५६ गुणांसह श्रीलंका तिसऱ्या स्थानावर आहेत. (ICC Test Championship)
पहिल्या चार क्रमांकांवरील संघांच्या कामगिरीवरून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे अंतिम दोन संघ ठरतील. २०२३-२५ अशा दोन हंगामातील कसोटी मालिकांवरून आयसीसीने क्रमवारी ठरवली आहे. यातील पहिले दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना जून महिन्यात लॉर्ड्सवर होणार आहे. (ICC Test Championship)
हेही पहा-