ICC Test Championship : भारताला कसोटी अजिंक्यपदासाठी पाकिस्तानची होऊ शकते मदत

ICC Test Championship : मेलबर्न कसोटीच्या दिवशीच पाकिस्तानचा संघ द आफ्रिकेविरुद्ध पहिली कसोटी खेळणार आहे

42
ICC Test Championship : भारताला कसोटी अजिंक्यपदासाठी पाकिस्तानची होऊ शकते मदत
ICC Test Championship : भारताला कसोटी अजिंक्यपदासाठी पाकिस्तानची होऊ शकते मदत
  • ऋजुता लुकतुके

आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची चुरस दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियासह दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका असे एकूण ४ संघ पहिल्या दोन जागांसाठी संघर्ष करत आहेत. आणि जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया, श्रीलंके दरम्यानच्या मालिकेपर्यंत ही चुरस तशीच राहणार आहे. भारतीय संघाचा विचार केला तर भारताला उर्वरित दोन कसोटी जिंकण्याबरोबरच इतर दोन संघ आपापल्या मालिकांमध्ये कशी कामगिरी करतात यावरही भारतीय संघाची आगेकूच अवलंबून असणार आहे. (ICC Test Championship)

(हेही वाचा- Boxing Day Test : बॉक्सिंग डे कसोटी म्हणजे काय; भारताची या कसोटीतील कामगिरी कशी आहे?)

भारतीय संघ सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या अव्वल आहे. भारतीय संघाला थेट प्रवेशासाठी उर्वरित दोन कसोटी सामने जिंकणं आवश्यक आहे. पण, आताचा संघाचा फॉर्म पाहता ही शक्यता जरा कठीण वाटत आहे. अशावेळी भारताला दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान दरम्यानच्या कसोटी मालिकेतील निकालावरही अवलंबून राहावं लागणार आहे. (ICC Test Championship)

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची मालिका बरोबरीत सुटली असं गृहित धरून या मालिकेतील निकालाचा भारताच्या वाटचालीवर काय परिणाम होऊ शकतो यावर एक नजर टाकूया, (ICC Test Championship)

(हेही वाचा- शासकीय कामे होणार एका क्लिकवर; प्रशासकीय कामकाजात AIचा वापर प्रभावी)

भारताने उर्वरित २ कसोटींपैकी १ जिंकली आणि पुढची अनिर्णित राखली, तर पाकिस्तानची भारताला खूप मोठी मदत होऊ शकते. भारतीय संघाची यशाची टक्केवारी तेव्हा ५७.०२ इतकी असेल. भारतीय संघ थेट अंतिम फेरी गाठू शकणार नाही. अशावेळी पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक कसोटी जरी जिंकली तरी भारतीय संघाचा अंतिम फेरीचा मार्ग मजबूत होतो. पाकिस्तानने आफ्रिकेविरुद्धची मालिका १-० अशी जरी जिंकली, तरी भारताच्या शक्यता वाढतात. आणि ती मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका या मालिकेवर अवलंबून राहावं लागेल. (ICC Test Championship)

पाकिस्तानने आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकणं भारतासाठी महत्त्वाचं आहे. पण, आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेला श्रीलंका वगळता एकाही आशियाई संघाने मायदेशात हरवलेलं नाही. त्यामुळे पाकिस्तानसाठीही ही कामगिरी अवघडच आहे. (ICC Test Championship)

(हेही वाचा- Anarkali Elephant: राणीच्या बागेत आता हत्तीचे दर्शन नाही)

जर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान २-२ अशी बरोबरी झाली तर पाकिस्तानला आफ्रिकेविरुद्धची मालिका २-० अशी जिंकावीच लागेल. तरंच भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचण्याचं स्वप्न पाहू शकतो. भारताचा मालिकेत पराभव झाला तर भारत कसोटी अजिंक्यपदाच्या स्पर्धेतूनही बाद होईल. (ICC Test Championship)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.