ICC Test Championship : कसोटी अजिंक्यपदाच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकून आता दक्षिण आफ्रिका अव्वल

भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

111
ICC Test Championship : आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आता भारताला किती संधी?
  • ऋजुता लुकतुके

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (ICC Test Championship) चुरस प्रत्येक कसोटीनंतर आता वाढत आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर गेबेखा कसोटीत १०९ धावांनी विजय मिळवत मालिकाही २-० ने जिंकली. आणि त्याचबरोबर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान पटकावलं आहे. आफ्रिकन संघाची यशाची टक्केवारी आता ६३.३३ इतकी आहे. आणि ऑस्ट्रेलियाची यशाची टक्केवारी ६०.७१ टक्के इतकी आहे. भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने ॲडलेड कसोटीत मिळवलेल्या विजयानंतर सोमवारी काही तासांसाठी ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर होता.

दक्षिण आफ्रिकेनं आता कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (ICC Test Championship) दमदार आघाडी घेतली आहे. आणि त्यांना मायदेशात पाकिस्तानविरुद्ध उर्वरित दोन कसोटी खेळायच्या आहेत. आणि त्या मालिकेतील कामगिरीनुसार, आफ्रिकन संघ अंतिम फेरीत जाईल की नाही ते ठरणार आहे. तर भारताला तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या किंवा पहिल्या स्थानावर पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध उर्वरित तीन कसोटी जिंकाव्या लागतील. आणि त्यानंतरही ऑस्ट्रेलिया श्रीलंकेविरुद्धची मालिका हरेल अशी अपेक्षा ठेवावी लागेल.

(हेही वाचा – Punjab News : भारतीय हद्दीत घुसलेला पाकिस्तानी घुसखोर ठार; पाकिस्तानने मागितला नाही मृतदेह)

तर श्रीलंकेच्या आशा अंधुक असल्या तरी त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाबरोबरच इतर मालिकांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धच्या मालिकेतील विजयाबरोबरच श्रीलंकेविरुद्घही विजय मिळवावा लागणार आहे. (ICC Test Championship)

WhatsApp Image 2024 12 10 at 10.00.29 AM

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.