ICC Test Championship : आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची चुरस वाढली, २-३ दिवसांत स्पष्ट होणार चित्र 

ICC Test Championship : आगामी तीन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी ३ महत्त्वाचे कसोटी सामने होणार आहेत

82
ICC Test Championship : भारतीय संघ अजूनही आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी गाठू शकतो?
ICC Test Championship : भारतीय संघ अजूनही आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी गाठू शकतो?
  • ऋजुता लुकतुके

आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने पुढील ६ दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. गुरुवारपासूनच ६ कसोटी संघ खेळाच्या मैदानात असणार आहे. आणि यातील प्रत्येक दिवस अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी महत्त्वाचा असेल. खासकरून पहिले तीन संघ असलेले भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासाठी हे दिवस महत्त्वाचे असतील. कारण, आता कोणते संघ अंतिम फेरीत पोहोचणार हे निर्विवादपणे  न ठरता इतर संघांचे पराभवही त्यासाठी आवश्यक ठरणार आहेत. बघूया ही चुरस नेमकी काय आहे? (ICC Test Championship)

 गुरुवारी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अवघ्या काही तासांत न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन हात करत आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघही शुक्रवारपासून दिवस – रात्र कसोटी खेळत आहेत. (ICC Test Championship)

(हेही वाचा- देशात 85 केंद्रीय आणि 28 नवोदय विद्यालय सुरू करणार; Union Cabinet च्या बैठकीत मान्यता)

या सगळ्या कसोटींचा अजिंक्यपद स्पर्धेतील शर्यतीवर थेट परिणाम होणार आहे. श्रीलंकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा सामना हा करो या मरो आहे. श्रीलंका जिंकल्यास शर्यतीत कायम राहील. श्रीलंकेचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी कसोटी हरला, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची पुढील मालिका जिंकूनही तो ५३.८५ टक्क्यांच्या वर जाऊ शकणार नाही. ही कसोटी अनिर्णित राहिली तर लंकेची यशाची टक्केवारी ४८.४८ इतकी राहील. (ICC Test Championship)

 दुसरीकडे इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर न्यूझीलंड संघ अडचणीत आला आहे. शिवाय षटकांची गती न राखल्यामुळे त्यांचे ३ गुण कमी झाले. यामुळे न्यूझीलंडची गुणतालिकेत चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. आता न्यूझीलंडने उरलेले दोन्ही कसोटी सामने जिंकले तरी ते स्वबळावर अंतिम फेरीत पोहोचू शकणार नाहीत. (ICC Test Championship)

(हेही वाचा- INS Tushil नौदलाच्या ताफ्यात होणार सामील)

न्यूझीलंड-श्रीलंका व्यतिरिक्त भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या शर्यतीत आहेत. जर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला पराभूत केले तर त्याची टक्केवारी ६३ हून जास्त होईल. आणि अंतिम फेरीच्या आशा बळावतील. तसंच ते भारताच्या पुढे जातील. ही कसोटी अनिर्णित राहिली तर त्यांचे टक्केवारी गुण ५६.६७ राहतील, ज्यामुळे ते अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम राहतील. (ICC Test Championship)

 ६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले तर त्याचे टक्केवारी गुण ६३.५४ होईल. अशा परिस्थितीत अंतिम फेरीसाठी भारताची दावेदारी आणखी मजबूत होईल. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकल्यास भारताचे केवळ ५७.२९ टक्के गुण राहतील. अशा परिस्थितीत भारत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरही घसरू शकतो. ऑस्ट्रेलिया पुन्हा ६०.७१ गुणांसह पहिल्या दोनांत पोहोचतील. हा सामना अनिर्णित राहिल्यास भारताचे गुण ५९.३८ होतील आणि ते पहिल्या दोनांत कायम राहतील.  (ICC Test Championship)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.