ICC Test Championship : कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी द्विस्तरीय कसोटी मालिका हव्यात – रवी शास्त्री

ICC Test Championship : कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी ही सूचना शास्त्री यांनी केली आहे.

42
ICC Test Championship : कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी द्विस्तरीय कसोटी मालिका हव्यात - रवी शास्त्री
  • ऋजुता लुकतुके

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा दोन स्तरांवर घेतली गेली पाहिजे, असं म्हटलं आहे. कसोटी क्रिकेट टिकून राहण्यासाठी हे आवश्यक आहे असं शास्त्री यांना वाटतं. टी-२० क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशावेळी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या मेलबर्न कसोटीसाठी एमसीजीवर पाच दिवसांत विक्रमी ३,७३,६९१ लोकांनी गर्दी केली. १९३६-३७ च्या अॅशेस मालिकेतील कसोटीचा विक्रम यंदा ८० वर्षांनंतर मोडीत निघाला. (ICC Test Championship)

हा धागा पकडूनच लोकांना काय बघायला आवडतं याचा अंदाज घेऊन शास्त्री यांनी दन स्तरावर ही स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ‘मेलबर्न कसोटीला विक्रमी प्रेक्षक लाभले. यातून हेच सिद्ध होतं की, तुल्यबळ प्रतिस्पर्धी असतील तर सामन्याला प्रेक्षक येतात. क्रिकेटमधील हा सगळ्यात चांगला आणि सगळ्यात आव्हानात्मक प्रकार आहे. तो टिकून ठेवायचा असेल तर अजिंक्यपद स्पर्धा द्विस्तरीय हवी,’ असं शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राच्या आपल्या स्तंभात म्हटलं आहे. (ICC Test Championship)

(हेही वाचा – MHADA ची 2025 मध्ये बंपर लॉटरी; दक्षिण मुंबईसह ‘या’ ठिकाणी घेता येणार घरं )

‘सर्वोत्तम संघ एकमेकांशी भिडले पाहिजेत, हे आयसीसीने आता समजून घ्यायला हवं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक आखताना दोन तगडे संघ मालिका खेळतील याला आयसीसीने महत्त्व द्यायला हवं, असं पुढे शास्त्री म्हणाले. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं हे २०१९ पासून दर दोन वर्षांनी ही स्पर्धा होते आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन संघांनी स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. तर भारतीय संघ दोनदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. (ICC Test Championship)

पण, दरवेळी वार्षिक वेळापत्रकावरून टीका होतेच होते. कारण, एकतर सगळे संघ एकसारख्या मालिका खेळत नाहीत. त्यामुळे कमी कसोटी खेळूनही संघ अंतिम फेरीत पोहोचू शकतो. त्यातच भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे कसोटीतील तगडे संघ मानले, तर या संघांदरम्यान पुरेशा मालिका होतच नाहीत. त्यामुळे दुबळ्या संघांविरुद्ध जिंकूनही अंतिम फेरी गाठता येते असे काही निकाल बघायला मिळाले आहेत. अगदी यंदाच्या हंगामातही दक्षिण आफ्रिकेवर तोच आरोप होतोय. बांगलादेश आणि अफगाणिस्तान विरुद्ध या संघाने विजय मिळवला. आणि न्यूझीलंड दौऱ्यात एसएटी-२० स्पर्धेत स्टार खेळाडू हवेत म्हणून दुय्यम संघ पाठवला. असं असतानाही दक्षिण आफ्रिकन संघ फारशा आव्हानात्मक मालिका न खेळताच अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यावर ही टीका होतेय. (ICC Test Championship)

(हेही वाचा – खोटी आश्वासने देण्यात केजरीवाल आघाडीवर; खासदार Dr. Sudhanshu Trivedi यांचा आरोप)

याला उपाय म्हणूनच कसोटी क्रिकेटला आंतरराष्ट्रीय वेळापत्रकात प्राधान्य देऊन तगडे संघ एकमेकांशी भिडतील अशी व्यवस्था आयसीसीनेच करावी, असं शास्त्री यांचं म्हणणं आहे. आणि आयसीसी कसोटी दर्जा मिळालेल्या १० संघांना ५-५ च्या गटात विभागून या मालिका व्हाव्यात असं शास्त्री यांनी सुचवलं आहे. तरंच कसोटी क्रिकेट जीवंत राहील, असं त्यांना वाटतं. (ICC Test Championship)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.