- ऋजुता लुकतुके
आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल संघ असलेल्या भारताला बंगळुरू कसोटीतील पराभवाचा धक्का जरुर बसला आहे. सध्या तरी अव्वल स्थान कायम असलं तरी आगामी बोर्डर-गावस्कर मालिकेचं आव्हान पाहता आता भारतीय संघाला हे स्थान टिकवण्यासाठी शिकस्त करावी लागणार आहे. उलट न्यूझीलंड संघाने ३६ वर्षांतील पहिला भारतीय भूमीवरील विजय नोंदवत आपल्या आशा पल्लवित केल्या आहेत.
२०२३-२५ हंगामातील हा भारतीय संघाचा तिसरा कसोटी पराभव आहे. संघाचे सध्या ९८ गुण आणि यशाची टक्केवारी ६८.०६ टक्के इतकी आहे. पण, हीच टक्केवारी या मालिकेपूर्वी ७४.२४ टक्के इतकी होती आणि ही पकड नक्कीच ढिली झाली आहे. या पराभवाचा आणखी एक परिणाम म्हणजे सध्या दुसरा असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ आता यशाच्या टक्केवारीच्या बाबतीत भारताच्या आणखी जवळ आला आहे. त्यांची टक्केवारी ६२.५ इतकी आहे. (ICC Test Championship)
(हेही वाचा – Ind vs NZ, 2nd Test : भारताच्या आक्रमक क्रिकेटची कर्णधार रोहितने केली पाठराखण)
ICC Test Championship Table After #INDvsNZ Result…
Don’t Depend On Others Let’s Win Our 6 Test Matches In Hand @ProteasMenCSA 👍#ProteaFire pic.twitter.com/1MFeJGosuB
— गौतम् కృష్ణ) 🇿🇦 (@Rider_Gauti) October 20, 2024
आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचाच दौरा करणार आहे. तिथे तेज खेळपट्टीवर ऑसी संघाविरुद्ध खेळण्याचं आव्हान भारताला परतून लावायचं आहे. घरच्या मैदानावर टक्केवारीतील हा फरक भरून काढण्याची संधी ऑस्ट्रेलियाला असणार आहे. भारताला मायेदेशात न्यूझीलंड विरुद्ध आणखी २ कसोटी खेळायच्या आहेत.
सध्या तिसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा संघ आहे. त्यांनी ९ कसोटींपैकी ५ जिंकल्या आहेत आणि ४ गमावल्या आहेत. त्यांची यशाची टक्केवारी आहे ५५.५६ तर न्यूझीलंड संघानेही भारताविरुद्घधच्या या विजयामुळे सहाव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. किवी संघ भारताविरुद्धच्या २ कसोटींनंतर मायदेशात इंग्लिश संघाबरोबर ३ कसोटी सामने खेळणार आहेत. त्यामुळे त्यांना कामगिरीत सातत्य राखत क्रमवारीत आगेकूच करण्याची चांगली संधी आहे. इंग्लिश संघ पाचव्या स्थानावर तर दक्षिण आफ्रिकन संघ सहाव्या स्थानावर आहेत. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज तळाला आहेत. (ICC Test Championship)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community