- ऋजुता लुकतुके
आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराहने गोलंदाजीतील अव्वल स्थान कायम राखलं आहे. बुमराहचं रेटिंग सध्या ९०८ गुणांचं आहे आणि ही त्याची क्रमवारीतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. बोर्ड-गावस्कर मालिकेत शेवटच्या सिडनी कसोटीत तो दुसऱ्या डावांत गोलंदाजी करू शकला नाही. पण, त्यामुळे त्याच्या रेटिंगवर परिणाम झालेला नाही. या मालिकेत बुमराहच्या खालोखाल कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. (ICC Test Ranking)
एखाद्या भारतीय तेज गोलंदाजाने ९०० क्रमवारीचे गुण मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यातून बुमराहचं जागतिक तेज गोलंदाजीतील वर्चस्वही अधोरेखित होतं. बुमराहप्रमाणेच डावखुरा फलंदाज रिषभ पंतला आपल्या कामगिरीचा फायदा क्रमवारीत झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दोन अर्धशतकं झळकावणारा पंत फलंदाजांच्या क्रमवारीत आता नवव्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या दहांत दोन भारतीय फलंदाज आहेत. यशस्वी जयस्वाल चौथ्या स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या यादीत रवींद्र जडेजाने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. (ICC Test Ranking)
(हेही वाचा – Vijay Hazare ODI Tournament : प्रसिध कृष्णा, देवदत्त पड्डिकल, वॉशिंग्टन सुंदर विजय हजारे स्पर्धेसाठी उपलब्ध)
RISHABH PANT MOVES TO NUMBER 9 IN ICC TEST BATTERS RANKING 🔥
– Pant is the only WK batter in Top 10 ranking. pic.twitter.com/bvqbz9tGON
— Johns. (@CricCrazyJohns) January 8, 2025
बुमराहप्रमाणेच आणखी एका गोलंदाजाला या मालिकेतील कामगिरीचा उपयोग झाला आहे. स्कॉट बोलंड २९ पायऱ्या वर चढून नवव्या स्थानावर आला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत ३ कसोटींत त्याने २१ बळी घेतले होते. तर पाकिस्तानविरुद्ध डावांत ६ बळी मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कासिगो रबाडा गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आफ्रिकेचाच मार्को यानसेन अष्टपैलूंच्या यादीत जडेजाच्या खालोखाल पोहोचला आहे. (ICC Test Ranking)
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स श्रीलंकेविरुद्धची मालिका खेळणार नाहीए. पण, गोलंदाजीबरोबरच अष्टपैलूंच्या यादीतही तो सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. (ICC Test Ranking)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community