- ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. आणि त्याचबरोबर आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आता ऑस्ट्रेलियाने भारताला मागे टाकून अव्वल क्रमांक पटकावला आहे. भारताने केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. पण, ऑस्ट्रेलियाला मालिका विजयाचे गुण मिळाले आहेत. आणि त्या जोरावर त्यांनी ही मुसंडी मारली आहे. (ICC Test Ranking)
पॅट कमिन्सच्या नेतृतवाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या एकदिवसीय तसंच कसोटीतही खणखणीत कामगिरी करतोय. आणि आयसीसी क्रमवारीत संघाने जोरदार पुनरागमन केलं आहे. ‘भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांचे ११८ रेटिंग गुण झाले आहेत. आणि भारताच्या खात्यात ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त सामान्य गुण होते. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची मालिकेत बरोबरी आणि तुलनेनं ऑस्ट्रेलियाने मिळवलेला मालिका विजय यामुळे ऑस्ट्रेलियन संघ सरस ठरला आहे,’ असं आयसीसीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. (ICC Test Ranking)
A new No.1 side is crowned in the @MRFWorldwide ICC Men’s Test Team Rankings 👑
More ⬇️
— ICC (@ICC) January 5, 2024
(हेही वाचा – Shortest Test Match : ‘मालिकेत इतका वेळ शिल्लक होता की, तिसरी निर्णायक कसोटीही घेता आली असती’)
ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या खालोखाल दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड हे संघ आहेत. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दरम्यानची तिसरी कसोटी सध्या सुरू आहे. या कसोटीचा निकाल आणि त्यानंतर भारत आणि इंग्लंड दरम्यान होणारी पाच कसोटींची मालिका यामुळे कसोटी क्रमवारीत नक्कीच मोठे बदल अपेक्षित आहेत. (ICC Test Ranking)
ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील विजय आणि पाठोपाठ कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान मिळाल्यामुळे हा संघ सध्या विजयरथावर आरुढ आहे. (ICC Test Ranking)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community