ICC Test Ranking : आयसीसी क्रमवारीत बुमराह सर्वोत्तम गोलंदाज, यशस्वीचीही घोडदौड सुरू

फक्त ११ कसोटींत यशस्वी फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

175
ICC Test Ranking : आयसीसी क्रमवारीत बुमराह सर्वोत्तम गोलंदाज, यशस्वीचीही घोडदौड सुरू
ICC Test Ranking : आयसीसी क्रमवारीत बुमराह सर्वोत्तम गोलंदाज, यशस्वीचीही घोडदौड सुरू
  • ऋजुता लुकतुके

मागचे काही महिने सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भारताचा मुख्य तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking) गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याने भारताचाच फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला मागे टाकलं आहे. तर फलंदाजांमध्ये यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) फक्त अकरा कसोटींनंतर तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. तर श्रीलंकेनं अलीकडेच न्यूझीलंड विरुद्धची मालिका २-० अशी जिंकली आहे. त्यानंतर लंकन गोलंदाज प्रभात जयसूर्या पहिल्यांदाच पहिल्या दहांत आला आहे.

भारतासाठी आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा पहिल्या दहांत पोहोचला आहे. सहा पायऱ्या वर चढत तो आता सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर न्यूझीलंड विरुद्धची मालिका आपल्या फलंदाजीने गाजवणारा आणि पहिल्या आठ डावांत किमान अर्धशतक झळकवणारा श्रीलंकेचा फलंदाज कामेंदू मेंडिस फलंदाजांच्या क्रमवारीत अकराव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

(हेही वाचा – Himanta Biswa Sarma : भारतात लपलेल्या बाबरांना धक्के मारून बाहेर काढा; हिमंत बिस्वा सरमांचे हिंदूंना आवाहन)

यावर्षी बुमराह दुसऱ्यांदा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी फेब्रुवारीत बुमराह पहिल्यांदा अव्वल स्थानावर पोहोचला होता. तेव्हाच आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान होण्यारा तो पहिला तेज गोलंदाज ठरला होता. त्यानंतरही बुमराहची कामगिरी सातत्यपूर्ण आहे. २०२४ मध्ये सर्वाधिक कसोटी बळी जसप्रीत बुमराहच्याच (Jasprit Bumrah) नावावर आहेत. त्याने १४ च्या स्ट्राईक रेटने ३८ बळी मिळवले आहेत. श्रीलंकेच्या प्रभात जयसूर्यानेही ३८ बळी मिळवले असले तरी त्याचा स्ट्राईकरेट जास्त आहे. (ICC Test Ranking)

आयसीसी कसोटी अजिंक्यपद क्रमवारीत भारतीय संघ आपलं अव्वल स्थान राखून आहे. आता न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन कसोटी मालिका भारतीय संघ खेळणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.