-
ऋजुता लुकतुके
भारती आणि न्यूझीलंड दरम्यानच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ ०-२ ने पिछाडीवर आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीतही भारतीय संघात सध्या त्रुटी जाणवत आहेत. पुणे कसोटीत तर अगदी प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवरही षटकामागे ४ पेक्षा जास्त गतीने धावा झाल्या. याचा फटका बुमराला आयसीसी कसोटी क्रमवारीतही बसला आहे. गोलंदाजांच्या यादीतील अव्वल स्थान त्याने गमावलं आहे. (ICC Test Ranking)
(हेही वाचा- International News: न्यूयॉर्कमधील शाळांना पहिल्यांदाच मिळाली दिवाळीची सुट्टी!)
दक्षिण आफ्रिकेचा तेज गोलंदाज कासिगो रबाडा बुमराला मागे टाकून पुढे गेला आहे. आफ्रिकन संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. आणि या दौऱ्यात पहिल्या मिरपूर कसोटीत रबाडाने दोन्ही डावांत मिळून ९ बळी मिळवले आहेत. तसंच या कसोटी दरम्यान त्याने ३०० कसोटी बळीही पूर्ण केले आहेत. त्या जोरावर त्याने क्रमवारीतही आघाडी घेतली आहे. आधी चौथ्या स्थानावर असलेला रबाडा अव्वल स्थानावर पोहोचला आहे. २९ वर्षीय रबाडा यापूर्वी जानेवारी २०१८ मध्ये अव्वल क्रमांकावर पोहोचला होता. आणि तेव्हा हे स्थान त्याने एक वर्षं एक महिने आपल्याकडे राखलं होतं. (ICC Test Ranking)
🔸 A new no. 1 Men’s Test bowler 👏
🔸 Major gains for Pakistan performers 👊More from ICC Men’s Rankings update ➡ https://t.co/tiPHe4GzoJ pic.twitter.com/wBjgm9rROE
— ICC (@ICC) October 30, 2024
त्यानंतर तो पुन्हा अव्वल झाला आहे. तर जसप्रीत बुमराची आता तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड आहे. तर चौथ्या स्थानावर रवीचंद्रन अश्विन आणि पाचव्या स्थानावर पॅट कमिन्स आहे. पाकिस्तानला इंग्लंड विरुद्ध विजय मिळवून देणारा नोमान अली पहिल्या दहांत पहिल्यांदाच झळकला आहे. आता तो नवव्या स्थानावर आहे. (ICC Test Ranking)
(हेही वाचा- IPL Retentions : के. एल. राहुलला वगळल्यावर लखनौ सुपरजायंट्सचे संजीव गोयंका झाले ‘असे’ ट्रोल)
पाक संघाने इंग्लंडविरुद्ध मायदेशातील कसोटी मालिका २-१ ने जिंकली आहे. आणि शेवटच्या २ कसोटींत नोमान अलीने पाकला सामना जिंकून दिला होता. आताची त्याची कामगिरी ही क्रमवारीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. तर भारताविरुद्ध पुणे कसोटीत चमकलेला किवी फिरकीपटू मिचेल सँटनर आता ३० जागांची उसळी घेऊन ४४ व्या स्थानावर पोहोचला आहे. पुणे कसोटी त्याने १३ बळी मिळवले होते. (ICC Test Ranking)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community