ICC Test Ranking : जसप्रीत बुमरा कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम

जसप्रीत बुमराने विशाखापट्टणम कसोटीनंतर पहिल्यांदा अव्वल स्थानावर झेप घेतली होती. 

189
Ind vs Eng 4th Test : जसप्रीत बुमराला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती?
Ind vs Eng 4th Test : जसप्रीत बुमराला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय अव्वल तेज गोलंदाज जसप्रीत बुमराने (Jasprit Bumrah) कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत आपलं अव्वल स्थान दुसऱ्या आठवड्यातही कायम राखलं आहे. विशाखापट्टणम कसोटीत ९ बळी टिपणाऱ्या बुमराने (Jasprit Bumrah) कसोटीत १५० बळींचा टप्पाही गाठला होता. आणि लागोपाठ प्रसिद्ध झालेल्या आयसीसी क्रमवारीत त्याने अव्वल स्थानही पटकावलं. १० दिवसांच्या विश्रांतीनंतरही त्याने अव्वल स्थान कायम राखलं आहे. (ICC Test Ranking)

(हेही वाचा – Ind vs Eng 3rd Test : सौराष्ट्र क्रिकेट स्टेडिअमला निरंजन शाह यांचं नाव)

फलंदाजांच्या क्रमवारीत मात्र बदल झाला असून न्यूझीलंडचा केन विल्यमसन अव्वल स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीच्या दोन्ही डावांत त्याने शतक ठोकलं होतं. भारताचा रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर कायम आहे. (ICC Test Ranking)

टी-२० क्रिकेटमधील क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज दरम्यानच्या मालिकेनंतर मोठे बदल झाले आहेत. ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्ही आणि डेव्हिड वॉर्नर यांनी क्रमवारीत मोठी झेप घेतली असून रोवन पॉवेल पहिल्या २५ जणांमध्ये असलेला एकमेव विंडिज फलंदाज आहे. तर गोलंदाजीतही ॲडम झंपा अकराव्या स्थानावर पोहोचला आहे. सुर्यकुमार यादव फलंदाजीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. (ICC Test Ranking)

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.