ICC Test Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर कायम

आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आपलं दुसरं स्थान भक्कम केलं आहे. 

179
ICC Test Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर कायम
  • ऋजुता लुकतुके

रांची कसोटीत इंग्लिश संघाचा ५ गडी राखून पराभव करत भारतीय संघाने (Indian team) मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. शिवाय आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसरं स्थानही भक्कम केलं आहे. या क्रमवारीत यशाची टक्केवारी काढली जाते. आणि या रेटिंग पॉइंट्समध्ये आता भारत ५९.२ गुणांवरून ६४.५८ गुणांवर पोहोचला आहे. तिसऱ्या स्थानावर असलेला ऑस्ट्रेलियन संघ रेटिंग गुणांच्या बाबतीत ५५ टक्क्यांवर आहे. तर बांगलादेशचा संघ ५० टक्क्यांवर आहे. (ICC Test Ranking)

तर इंग्लिश संघाची आणखी घसरण होऊन ते आठव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. इंग्लंडच्या खाली आता फक्त श्रीलंकन संघ आहे. आता सुरु असलेल्या कसोटी अजिंक्यपद हंगामात भारतीय संघ (Indian team) एकूण ८ कसोटी सामने खेळला आहे. आणि यातले ५ जिंकताना २ सामने गमावले आहेत. आणि एक सामना बरोबरीत सुटला आहे. (ICC Test Ranking)

(हेही वाचा – Ind vs Eng 4th Test : रोहित शर्मा युवा खेळाडूंविषयी काय म्हणाला?)

या महिन्यात होणार अजिंक्यपद स्पर्धा

अव्वल क्रमांकावर न्यूझीलंडचा संघ आहे. आणि त्यांचे ७५ रेटिंग गुण झाले आहेत. या हंगामात किवी संघ फक्त ४ कसोटी सामने खेळला आहे. कसोटीतील विजयासाठी १२ गुण देण्यात येतात. बरोबरीत सुटलेल्या सामन्यासाठी ६ गुण तर अनिर्णित झालेला सामन्यासाठी ४ गुण देण्यात येतात. मिळालेल्या एकूण गुणांची टक्केवारी काढली जाते. आणि अव्वल दोन संघ दोन वर्षांच्या हंगामाच्या शेवटी अजिंक्यपदासाठी एकमेकांशी भिडतात. २०२५ च्या जून महिन्यात अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. (ICC Test Ranking)

भारतीय संघाने (Indian team) आतापर्यंत झालेल्या दोनही अजिंक्यपदाच्या अंतिम फेरी गाठल्या आहेत. पण, एकदा न्यूझीलंड आणि दुसऱ्या खेपेला ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघ पराभूत झाला होता. यावेळी भारतीय संघाने धरमशालाची पाचवी कसोटी जिंकली तर क्रमवारीतील दुसरं स्थान आणखी भक्कम करण्याची संधी भारताकडे आहे. (ICC Test Ranking)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.