- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने (Indian team) रांचीत इंग्लिश संघाविरुद्ध विजय मिळवला, या विजयात यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या तिघांनी अर्धशतकं ठोकून भारतीय डावांना आकार दिला. त्याच्या जोरावर आता आयसीसीच्या (ICC) ताज्या कसोटी क्रमवारीतही तिघांनी आतापर्यंतचं आपलं सर्वोत्तम स्थान मिळवलं आहे. (ICC Test Ranking)
इतकंच नाही तर इंग्लिश संघाचा अनुभवी फलंदाज जो रुटही आता फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने रांची कसोटीच्या पहिल्या डावात शतक ठोकलं होतं. पहिल्या स्थानावर न्यूझीलंडचा केन विल्यमसन कायम आहे. जयस्वाल तीन जागांची झेप घेऊन बाराव्या स्थानावर पोहोचला आहे. तर शुभमन गिलही ३१ व्या क्रमांकावर आणि ध्रुव जुरेल पहिल्यांदाच पहिल्या शंभर जणांत येऊन ६९व्या क्रमांकावर स्थिरावला आहे. (ICC Test Ranking)
India and England stars rise in the latest ICC Test Player Rankings 📈https://t.co/wZltapMRzf
— ICC (@ICC) February 28, 2024
(हेही वाचा – Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल; सलीम कुत्ता डान्स पार्टी प्रकरण भोवले)
पहिल्या दहांत हे तीन भारतीय गोलंदाज
गोलंदाजांच्या क्रमवारीत रांची कसोटीत विश्रांती घेतलेला जसप्रीत बुमरा अजूनही अव्वल स्थान राखून आहे. तर दुसऱ्या डावात ४ बळी टिपणारा कुलदीप यादव १० जागांची झेप घेऊन ३२ व्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या दहांत अजूनही जसप्रीत, अश्विन आणि जडेजा हे तीन भारतीय गोलंदाज आहेत. (ICC Test Ranking)
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताचा रवींद्र जडेजा अव्वल आहे. आणि या यादीतही जो रुट आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या दहांत जडेजाच्या बरोबरीने अश्विन हा आणखी एक भारतीय खेळाडू आहे. (ICC Test Ranking)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community