ICC Test Rankings : कसोटी क्रमवारीत अश्विन अव्वल स्थानावर कायम, तर बुमराची चौथ्या स्थानावर झेप

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील कामगिरीच्या जोरावर जसप्रीत बुमराने क्रमवारीत आगेकूच केली आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत मात्र जडेजा पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

266
ICC Test Rankings : कसोटी क्रमवारीत अश्विन अव्वल स्थानावर कायम, तर बुमराची चौथ्या स्थानावर झेप

ऋजुता लुकतुके

आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या (ICC Test Rankings) क्रमवारीत भारताच्या रवीचंद्रन अश्विनने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. तर जसप्रीत बुमराने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताने २८ धावांनी गमावला. या कसोटीत ६ बळी घेत अश्विनचे क्रमवारीतील रेटिंग गुण ८५३ इतके झाले आहेत. तर जसप्रीतनेही त्या कसोटीत ६ विकेट्स घेतल्या होत्या. या कामगिरीमुळे बुमरा क्रमवारीची शिडी वर चढला आहे.

(हेही वाचा – Rohit Pawar यांची ईडीकडून पुन्हा चौकशी होणार)

या क्रमवारीत पहिल्या दहांत असलेला तिसरा गोलंदाज आहे तो म्हणजे रवींद्र जडेजा.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत मात्र जडेजा पहिल्या स्थानावर (ICC Test Rankings) विराजमान आहे. हैद्राबाद कसोटीतील कामगिरीनंतर जो रुट त्याला जोरदार टक्कर देऊ शकतो. ३३ वर्षीय जो रुट प्राधान्याने मधल्या फळीतील फलंदाज आहे. पण, या मालिकेत त्याने चेंडूनेही महत्त्वाची भूमिका निभावली आहे. चौथा आणि अनुभवी फिरकी गोलंदाज म्हणून त्याने हैद्राबाद कसोटीत आपली छाप पाडली. त्या जोरावर सध्या तो अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या मालिकेत अशीच गोलंदाजी करत राहिला तर जडेजाला तो नक्कीच आव्हान देऊ शकतो. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अश्विन आणि अक्षर हे इतर दोन भारतीय खेळाडू पहिल्या दहामध्ये आहेत.

(हेही वाचा – Budget 2024 : अर्थसंकल्पाशी संबंधित ही 92 वर्षे जुनी परंपरा कधी बदलली, हे तुम्हाला माहीत आहे का ?)

फलंदाजांचा विचार करता विराट कोहली सहाव्या क्रमांकावर (ICC Test Rankings) असून पहिल्या दहांत असलेला तो एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे. इंग्लंडकडून हैद्राबाद कसोटीत १९६ धावांची खेळी करणारा ऑली पोप आता २० स्थानांची उडी घेऊन १५व्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.