- ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकाच्या (Champions Trophy) आयोजनात पाकिस्तानमध्ये बरेच गोंधळ झाले. सामना सुरू असताना दोनदा प्रेक्षकांनी मैदानात घुसखोरी केली. तर ३ साखळी सामने पावसामुळे वाया गेले. यात मैदानातील पाणी काढून टाकण्यात पाकिस्तानी यंत्रणा कमी पडल्याचा ठपका अनेकांनी ठेवला. अशावेळी आता चॅम्पियन्स करंडाच्या (Champions Trophy) पाठोपाठ महिला विश्वचषकाची पात्रता (ICC Women Qualifiers) स्पर्धाही याच महिन्यात पाकिस्तानमध्ये होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ही माहिती दिली आहे. (ICC Women Qualifiers)
पाकिस्तान बरोबरच वेस्ट इंडिज, स्कॉटलंड, आयर्लंड, श्रीलंका आणि थायलंड हे संघ यात सहभागी होणार आहेत. अजून या स्पर्धेचे वेळापत्रक तसेच ठिकाणही ठरलेले नसले तरी आयसीसीबरोबर या गोष्टी ठरवण्याचे काम सुरू आहे, असे पाक बोर्डाचं म्हणणं आहे. तसेच मुलतान, कराची आणि फैझलाबाद या ठिकाणी हे सामने भरवण्यात येणार असल्याचं समजतंय. पाकिस्तानमध्येही ११ एप्रिलपासून पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा भरवण्यात येणार आहे. या स्पर्धेंचा हा दहावा हंगाम असेल. त्यापूर्वी ही पात्रता स्पर्धा घेण्याचा पाकिस्तानचा विचार आहे. (ICC Women Qualifiers)
(हेही वाचा – Ajinkya Rahane : आयपीएलच्या नवीन हंगामासाठी अजिंक्य रहाणे कोलकात्याचा कर्णधार)
पाकिस्तानमध्ये अलीकडेच न्यूझीलंड (New Zealand) आणि दक्षिण आफ्रिकेबरोबरची (South Africa) एक तिरंगी मालिका पार पडली. त्यापाठोपाठ चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy) आणि आता आणखी एक आयसीसी मान्यताप्राप्त स्पर्धा होणार असल्यामुळे पाक क्रिकेट मंडळात आनंद व्यक्त होत आहे. पाकिस्तानमध्ये होत असलेली ही पहिलीच आयसीसी महिला स्पर्धा आहे. (ICC Women Qualifiers)
या स्पर्धेतून ४ संघ महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरतील. आयसीसीच्या स्पर्धांचं आयोजन करण्याची लागोपाठ मिळालेली संधी पाकिस्तानच्या डुबत्या अर्थव्यवस्थेसाठीही दिलासादायक आहे. पाक क्रिकेट बोर्डही अलीकडे दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवणे हा एकमेव मार्ग आहे. (ICC Women Qualifiers)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community