- ऋजुता लुकतुके
येत्या ३ ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिरातीत महिलांचा टी-२० विश्वचषक सुरू होत आहे. बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे ही स्पर्धा ऐनवेळी तिथून शारजा आणि दुबईला हलवण्यात आली. आता या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून आयसीसीने स्पर्धेचं अधिकृत गाणं किंवा थीम साँग लाँच केलं आहे. भारतातील विश (w.i.s.h.) या पॉप समुहाने हे गाणं गायलं आहे. ‘वॉटेव्हर इट टेक्स,’ असे गाण्याचे बोल आहेत. महिला क्रिकेटमधील महत्त्वाचे टप्पे या गाण्यासाठी तयार केलेल्या व्हीडिओतून दाखवण्यात आले आहेत. आयसीसीचे महाव्यवस्थापक क्लेअर फर्लांग यांनी हे गाणं प्रसिद्ध करताना त्या मागची भूमिका समजावून सांगितली. ‘महिला क्रिकेट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चांगलं रुजलं आहे. महिलांनी आपल्या कामगिरीने आपला ठसा उमटवला आहे. ते करताना महिला क्रिकेटचे महत्त्वाचे टप्पे या गाण्यातून दाखवण्यात आले आहेत. त्यासाठी खेळाडूंची जिद्द कशी पणाला लागली होती, हे दाखवणारं हे गाणं आहे,’ असं फर्लाँग म्हणाले.
Ready to shake the ground 💥
Presenting the official ICC Women’s #T20WorldCup 2024 event song ‘Whatever It Takes’ performed by @WiSH_Official__#WhateverItTakes https://t.co/3I3TJmJndo
— ICC (@ICC) September 23, 2024
(हेही वाचा – Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेवर गोळी झाडण्याची पोलिसांवर वेळ का आली? पोलिसांनी सांगितलं नेमकं कारण)
भारतातील पहिल्या महिला पॉप ग्रुप W.i.S.H. ने हे गाणे गायले आहे. या गाण्याचे संगीत दिग्दर्शक मिकी मॅक्लेरी असून संगीतकार पार्थ पारेख आहेत. याची निर्मिती बे म्युझिक हाऊसने केली आहे. आयसीसीने हे गाणे आपल्या यूट्यूब चॅनलवर रिलीज केले आहे.
W.i.S.H. गर्ल ग्रुपने गाणे लॉन्च करताना सांगितले की, “आम्हाला हे घोषित करताना अत्यंत अभिमान वाटतो की, सर्व मुलींचा गट म्हणून आम्ही महिला टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी अधिकृत कार्यक्रम गीत तयार केले आहे. क्रिकेट ही एक शक्तिशाली शक्ती आहे जी आपल्या देशातील आणि जगभरातील लोकांना एकत्र करते आणि अशा स्पर्धेत योगदान देणे हा सन्मान आहे. जेमिमाह रॉड्रिग्स आणि स्मृती मानधना यांचे मोठे चाहते असल्याने, आम्हाला या गाण्याचा हुक एक स्टेप हवा होता. या गाण्यात जेमिमा रॉड्रिग्स आणि स्मृती मानधना यांच्या हुक स्टेपचाही समावेश करण्यात आला आहे, जो त्या मैदानावर अनेकदा करताना दिसल्या आहेत. हे गाणे १ मिनिट ४० सेकंदाचे आहे.
(हेही वाचा – Siddhivinayak Prasad : ‘तो’ व्हिडिओ मंदिर परिसरातील नाही; सदा सरवणकर यांचे स्पष्टीकरण)
बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात ३ ऑक्टोबर रोजी शारजा इथं सलामीचा सामना होणार आहे. भारतीय महिला संघ दुबईत ४ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. याच मैदानावर ६ ऑक्टोबरला संघ पुन्हा पाकिस्तानशी भिडणार आहे. पाकिस्तान ३ ऑक्टोबरलाच श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
३ ते २० ऑक्टोबर दरम्यान महिला टी२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. या विश्वचषकात १० संघ सहभागी होणार आहेत. १८ दिवसांत २३ सामने होणार आहेत. भारताचा समावेश अ गटात असून या गटात भारताबरोबरच ६ वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेला ऑस्ट्रेलियन महिला संघही आहे. या व्यतिरिक्त या गटात पाकिस्तान, न्यूझीलंड आणि क्वालिफायर संघाचा समावेश आहे. तर यजमान बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि क्वालिफायर-२ संघ ब गटात आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community