ICC World Cup 2023 : पहिल्या सराव सामन्यासाठी भारतीय संघ गुवाहाटीमध्ये दाखल

भारतात पुढचा दीड महिना एकदिवसीय विश्वचषकाची धूम असेल.

156
ICC World Cup 2023 : पहिल्या सराव सामन्यासाठी भारतीय संघ गुवाहाटीमध्ये दाखल
ऋजुता लुकतुके

एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचा पहिला (ICC World Cup 2023) सराव सामना ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे इंग्लंड विरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय संघात जखमी अक्षर पटेल ऐवजी आता रवीचंद्रन अश्विनचा समावेश झालाय. त्यामुळे गुवाहाटीत भारतीय संघ पोहोचला तेव्हा अश्विनही इतर खेळाडूंबरोबर होता.

विश्वचषकासाठी (ICC World Cup 2023) भारतीय संघाची निवड गेल्या महिन्यातच झाली होती. फक्त आशिया चषकादरम्यानच अक्षर पटेलला दुखापत झाल्यामुळे त्याला निवड समितीने तंदुरुस्तीसाठी वेळ दिला होता. तो वेळेत तंदुरुस्त झाला नाही तर बदली खेळाडूला निवडण्याचा पर्याय अजित आगरकरच्या निवड समितीने ठेवला होता. त्याप्रमाणे गुरुवारी सकाळी अक्षर पटेल ऐवजी अश्विनची वर्णी संघात लागली आहे.

(हेही वाचा – Asian Games 2023 : सहाव्या दिवसाची सुवर्ण पदक जिंकून सुरुवात; भारताची एकूण २७ पदकांची कमाई)

अक्षर व्यतिरिक्त के एल राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमरा (ICC World Cup 2023) या इतर जायबंदी खेळाडूंनी आता फिटनेस परत कमावला आहे. त्यांना सामन्यांचा सरावही पुरेसा मिळाला आहे. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड काल संतुष्ट होते. नुकतीच भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिकाही २-१ ने जिंकली आहे.

३० सप्टेंबरच्या इंग्लंड बरोबरच्या सराव सामन्यानंतर भारताचा दुसरा (ICC World Cup 2023) सराव सामना ३ ऑक्टोबरला नेदरलँड्स विरुद्ध केरळमध्ये थीरूअनंतपुरम इथं होणार आहे. त्यानंतर भारताची विश्वचषक मोहीम सुरू होईल ती ७ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर. तर भारत विरुद्ध पाकिस्तान हा पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.