ICC World Cup 2023 : हार्दिक पांड्या संघात परतल्यावर कुणाला मिळणार डच्चू?

हार्दिक पांड्या दुखापतीतून सावरलाय आणि मुंबईतच तो भारतीय संघात सामील होणार आहे. श्रीलंकेविरुद्ध तो खेळला नाही, तरी जेव्हा केव्हा तो खेळेल, तेव्हा संघात कुणाची जागा घेईल?

119
ICC World Cup 2023 : हार्दिक पांड्या संघात परतल्यावर कुणाला मिळणार डच्चू?
ICC World Cup 2023 : हार्दिक पांड्या संघात परतल्यावर कुणाला मिळणार डच्चू?
  • ऋजुता लुकतुके

हार्दिक पांड्या दुखापतीतून सावरलाय आणि मुंबईतच तो भारतीय संघात सामील होणार आहे. श्रीलंकेविरुद्ध तो खेळला नाही, तरी जेव्हा केव्हा तो खेळेल, तेव्हा संघात कुणाची जागा घेईल? (ICC World Cup 2023)

हार्दिक पांड्या त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीतून आता सावरलाय आणि एक-दोन दिवसांतच मुंबईत तो भारतीय संघात सामील होईल अशी लक्षणं आहेत. तो श्रीलंकेविरुद्ध खेळणार नाही. पण, त्यानंतर तो नक्कीच संघात पुनरागमन करेल आणि तेव्हा तो कुणाची जागा घेईल असा प्रश्न आतापासूनच विचारला जाऊ लागला आहे. (ICC World Cup 2023)

विजयाच्या मार्गावर चालणाऱ्या संघात बदल करायला कर्णधार आणि संघ व्यवस्थापक फारसे उत्सुक नसतात आणि विश्वचषका सारख्या स्पर्धेत तर त्याहून नाही. त्यामुळेच १९ ऑक्टोबरला हार्दिकला दुखापत झाली, तेव्हा दोन सामने आरामात जिंकलेल्या भारतीय संघासाठी तो धक्काच होता. अष्टपैलू खेळाडूची जागा घेणं तर कठीणच. त्यामुळे हार्दिकची गैरहजेरी उठून दिसली. (ICC World Cup 2023)

पण, पुढच्या दोन सामन्यांत संघाने केलेले दोन बदल चांगलेच यशस्वी झाले आहेत. सुर्यकुमारने आधीच्याच सामन्यात जबाबदारीने फलंदाजी केलीय. तर मोहम्मद शामीने आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करताना दोन सामन्यांत ९ बळी टिपले आहेत. त्यामुळे भारतीय संघासाठी पुन्हा एकदा विजयी कॉम्बिनेशन तयार झालं आहे आणि आता कर्णधार रोहित आणि संघ प्रशासन यांच्यासमोर प्रश्न आहे तो हार्दिक तंदुरुस्त झाल्यावर काय करायचं? (ICC World Cup 2023)

(हेही वाचा – Maratha Reservation : सरकारच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा; मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांची विनंती)

हार्दिक पांड्या त्याच्या अष्टपैलूत्वामुळे एक उपयुक्त खेळाडू आहे. संघात पाच गोलंदाज असले तरी हार्दिक सहावा गोलंदाज म्हणून कर्णधाराला चांगला पर्याय उपलब्ध करून देतो. शिवाय तो १० षटकं टाकू शकेल असा गोलंदाज आहे. तर फलंदाजीतही त्याची तडाखेबंद फलंदाजी संघाला नेहमीच उपयोगी पडत आली आहे. त्याच्या कामगिरीच्या जोरावर तो संघाचा उपकर्णधारही बनला आहे. (ICC World Cup 2023)

त्यामुळे तंदुरुस्त असलेला हार्दिक संघात असेल अशी दाट शक्यता आहे. त्याचवेळी के एल राहुलने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यानंतर वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे. संघात इतक्यात बदल होणार नाहीत, असं तो म्हणतोय. काही जणांनी त्याचा अर्थ उरलेल्या साखळी सामन्यांत भारतीय संघ बदल करणार नाही आणि उपांत्य फेरीत हार्दिकचा पुन्हा समावेश होईल असा लावला आहे. (ICC World Cup 2023)

तर काहींना मोहम्मद शामी आणि सुर्यकुमार हे संघात हवे असं वाटतं. त्यामुळे हार्दिक फारसा फॉर्ममध्ये नसलेल्या श्रेयस अय्यरची जागा घेईल असं वाटतंय. अर्थात, माजी खेळाडू आणि चाहत्यांमध्ये सध्या या विषयी भरपूर चर्चा रंगली असली, तरी अंतिम निर्णय भारतीय संघ प्रशासन घेणार आहे. श्रीलंकेविरुद्धचा सामना संपल्यानंतर या गोष्टीवर नक्कीच विचार होईल. (ICC World Cup 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.