न्यूझीलंडने पहिल्या वन-डे सामन्यात भारतावर दणदणीत विजय मिळवत या मालिकेत आघाडी घेतली आहे. या विजयामुळे आता 2023 साठीच्या वर्ल्ड कपसाठीच्या सुपर लिग तालिकेत न्यूझीलंडने मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे आता वर्ल्ड कप खेळणा-या संघांच्या तालिकेत मोठा फेरबदल झाला आहे.
न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या पहिल्या वन-डेतील विजयातून वर्ल्ड कप सुपर लीगच्या तालिकेत थेट चौथ्या क्रमांकावर झेप घेतली असून, न्यूझीलंड संघाने 120 गुणांसह ऑस्ट्रेलियासोबत बरोबरी साधली आहे. ही न्यूझीलंडसाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे.
(हेही वाचाः सर्दी,खोकल्यासाठी औषधं घेताय? मग सावध रहा, देशात इतक्या अँटिबायोटिक्सना परवानगीच नाही)
अशी आहे वर्ल्ड कप सुपर लीग
वर्ल्ड कप सुपर लीग हे वन-डे सामन्यांची नवी स्पर्धा दोन वर्षांसाठी खेळवली जाणार आहे. ICC कडून पहिल्यांदाच अशा पद्धतीचा प्रयोग करण्यात येत असून, या लीगमधून 2023 च्या वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेतील संघांची निवड होणार आहे. 12 संपूर्ण सदस्य आणि नेदरलँड्स असे एकूण 13 संघ या यादीत आहेत.
New Zealand and Afghanistan have made strides in the ICC @cricketworldcup Super League 📈
More on #CWCSL 👉 https://t.co/wGJb3APEr5 pic.twitter.com/NocNlV8Fcs
— ICC (@ICC) November 26, 2022
वर्ल्ड कप सुपर लीगच्या तालिकेत असणारे पहिले 7 संघ हे 2023 च्या वर्ल्ड कपसाठी थेट निवडले जाणार असून, तळातील 5 संघांमध्ये पात्रता फेरी खेळवण्यात येणार आहे. या तालिकेत भारत 129 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तसेच 2023 चा वर्ल्ड कप हा भारतात होणार असल्यामुळे भारत हा आधीच या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
असे होणार सामने
या वर्ल्ड कप सुपर लीगमध्ये एक संघ इतर 8 संघांविरुद्ध किमान तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. देशात चार आणि देशाबाहेर चार अशा या मालिका असणार आहेत. त्यामुळे एकूण 24 वन-डे सामने प्रत्येक संघ खेळणार असून, प्रत्येक विजयासाठी विजयी संघाला 10 गुण देण्यात येणार आहेत. तसेच सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना 5 गुण विभागून देण्यात येणार आहेत, तर पराभूत संघाला एकही गुण मिळणार नाही.
Join Our WhatsApp Community